‘बाबा का ढाबा’चे मालक कांता प्रसाद यांचा आत्महत्येचा प्रयत्न; रुग्णालयात केलं दाखल

नवी दिल्ली : सोशल मीडियामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेले दिल्लीमधील ‘बाबा का ढाबा’चे मालक कांता प्रसाद यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. त्यांना गुरुवारी रात्री सफदरजंग रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यता आलं आहे.

युट्यूबर गौरन वासव याने कांता प्रसाद यांचा व्हिडीओ शूट करत त्यांची परिस्थिती सांगित्यानंतर ते प्रसिद्धीच्या झोतात आले होते. यावरुन नंतर अनेक वाददेखील झाले.

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “गुरुवारी रात्री सव्वा ११ वाजण्याच्या सुमारास ८१ वर्षीय कांता प्रसाद सफदरजंग रुग्णालयात दाखल असल्याची माहिती मिळाली. कांता प्रसाद यांनी मद्य तसंच झोपेच्या गोळ्या एकत्र घेतलं होतं. त्यांच्या मुलानेही जबाबात हीच माहिती दिली आहे. रुग्णालयाने आपल्या रिपोर्टमध्ये ते बेशुद्ध असल्याचं म्हटलं आहे”. पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा