चक्क कृषी दुकानासमोरच रॉकेल ओतून घेऊन शेतकऱ्याचा स्वत:ला पेटवण्याचा प्रयत्न

बीड : बीड जिल्ह्यातील नांदुरघाट येथे रविवारी लालासाहेब दादाराव तांदळे (वय ५५, रा.फकराबाद ता.वाशी, जि. उस्मानाबाद) या शेतकऱ्याने स्वतच्या अंगावर रॉकेल ओतून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. फकराबाद हे उस्मानाबाद जिल्ह्यात असले तरी नांदुरघाट (ता.केज) पासून चार किमी अंतरावर असल्याने कृषी बाजाराला याच ठिकाणी शेतकरी येतात. लालासाहेब तांदळे यांनी नांदुरघाट येथील श्रेनिक कृषि सेवा केंद्रातून सोयाबीन बियाणे खरेदी केले पण पेरणीनंतर बियाणेच उगवले नाही. कृषि दुकानादाराकडे तक्रार करुन बियाणे बदलून देण्याची मागणी केली. मात्र दुकानदाराने काहीही ऐकून घेतले नाही.

अक्कलकोटच्या कोविड हॉस्पिटलला भरघोस निधी

संतप्त झालेल्या तांदळे यांनी थेट दुकानासमोर अंगावर रॉकेल ओतून घेत पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. सरपंच नितीन बिक्कड व इतर शेतकऱ्यांनी प्रसंगावधान दाखवल्याने अनर्थ टळला. तालुका कृषी अधिकाऱ्यांसह पंचायत समितीचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

कोविडसंदर्भात राज्यात आतापर्यंत १ लाख १२ हजार गुन्हे दाखल-गृहमंत्री

कृषी दुकानातून खरेदी केलेले सोयाबीनचे बियाणे उगवलेच नाही. आणि तक्रार करुनही दुकानदार दखल घेत नसल्याने संतप्त झालेल्या ५५ वर्षीय शेतकऱ्याने रविवारी चक्क कृषी दुकानासमोरच रॉकेल ओतून घेऊन स्वत:ला पेटवण्याचा प्रयत्न केला. मात्र इतर शेतकऱ्यांनी प्रसंगावधान दाखवल्याने अनर्थ टळला. घटनास्थळी पंचायत समितीचे अधिकारी दाखल झाले. बियाणे उगवले नसल्याने संबंधित कंपनीविरुध्द गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.