‘पोलिस अधिकाऱ्यांकडूनच सरकार पाडण्याचा प्रयत्न’ , गृहमंत्र्यांच्या वक्तव्याचा मोठा गौप्यस्फोट

काही अधिकारी सरकार पाडण्याचा प्रयत्न करीत असल्याचं वृत्त निराधार असल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. मी असं काहीही बोललेलो नाही, माझ्या तोंडी ते वक्तव्य टाकण्यात आलं आहे, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे. पुण्यात पत्रकार परिषेदत ते बोलत होते.

”एका वृत्तपत्रानं माझं वक्तव्य म्हणून जी बातमी छापली, ती निराधार आहे. माझ्या तोंडामध्ये तसं व्यक्तव्य टाकण्यात आलं आहे. मी असं कुठेही म्हटलेलो नाही. जर आपण यासंदर्भातील माझा व्हिडिओ पाहिला तर आपल्याला वस्तुस्थिती लक्षात येईल.”

चार ते पाच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचे प्रयत्न केले होते. त्यात एका अतिवरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्याचाही समावेश होता. मात्र, हे प्रकरण योग्य प्रकारे हाताळले गेले, त्यावरुन आज पुण्यात पत्रकारांनी देशमुख यांना प्रश्न विचारले. या प्रश्नांना उत्तरं देताना त्यांनी याचा इन्कार केला.

कोरोनाच्या काळात मागील सात महिन्यांत पोलिसांनी खूप काम केले आहे. आमचे पोलीस जरुर थकले आहेत पण हिम्मत हारलेले नाहीत. या काळात कर्तव्य निभावताना २०८ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी शहीद झाले आहेत. दरम्यान, या शहीद पोलिसांच्या कुटुंबाला ६५ लाख रूपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे, अशी माहिती यावेळी गृहमंत्री देशमुख यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या :-

इतक्या पारदर्शक बदल्या यापूर्वी कधीच झाल्या नाहीत ; शिवसेनेचा भाजपला टोला

मराठा आरक्षणाच्या १३% जागा रिक्त ठेवून पोलीस भरती करावी ; विनायक मेटेंची मागणी

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.