Atul Bhatkhalkar | “मविआच्या काळात न फुटलेले घरकोंबडा ब्रॅंडचे फटाके…”; अतुल भातखळकरांचा ठाकरेंना टोला

Atul Bhatkhalkar | पुणे : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) यांनी काल औरंगाबाद जिल्ह्याचा दौरा केला आहे. त्यांनी पेंढापूर येथे शेतकऱ्यांची भेट घेत ओल्या दुष्काळाचीही पाहणी केली. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दर हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत करावी, अशी मागणीही उद्धव ठाकरे यांनी केली.

उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्यावरून आता राजकीय नेते प्रतिक्रिया देत आहेत. तसेच  राज्यातील शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी, अशी मागणी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. शिंदे गटातील काही नेत्यांनी उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून खोचक टीका केली आहे. अशातच दिवाळीच्या पहिल्याच दिवशी भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी ट्विटच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल चढवला आहे.

भातखळकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, “मविआच्या काळात न फुटलेले घरकोंबडा ब्रॅंडचे फटाके, ॲपटीबार…घरटीबॅाम्ब…सुरसुरी, अशा शब्दात त्यांनी ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. भातखळकर यांनी ट्विटमध्ये एका फटाक्यांचा बॉक्स आणि उद्धव ठाकरे यांचा एक फोटो शेअर केला. तर या ट्विटला उपहासात्मक कॅप्शन देत उद्धव ठाकरे यांना चिमटा काढलाय.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या औरंगाबाद दौऱ्यावरून राजकारण पेटले आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे असलेल्या आसुडाचा योग्य वापर करावा. सत्ताधाऱ्यांवर आसूड ओढून शेतकऱ्यांनी त्यांचे हक्क घ्यावेत. शेतकऱ्यांनी हताश न होता लढावे, असे उद्धव ठाकरे औरंगाबाद दौऱ्यादम्यान म्हणाले होते. तर त्यांच्या याच दौऱ्याबद्दल बोलताना शिंदे गटातील नेते उदय सामंत, अब्दुल सत्तार यांनी टीका केली होती. ठाकरेंचा दौरा फक्त २४ मिनिटांचा आहे, असे सत्तार म्हणाले होते. तसेच भाजपाचे नेते रावसाहेब दानवे यांनी उद्धव ठाकरे यांनी सत्तेत असताना अडीच वर्षांमध्ये काहीही केले नाही. ते फक्त घरात बसून होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी अगोदर त्यांच्यावरच आसूड ओढावा, अशा शब्दात टीका केलीय.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.