‘सत्तेसाठी सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसची धुणीभांडी करणाऱ्यांनी मोठ्या बाता करु नये’

मुंबई : शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून खासदार संजय राऊत यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत अपमानकारक उद्गार काढणाऱ्यांना खडेबोल सुनावले. त्यानंतर खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना स्वातंत्र्यवीर सावरकरांना देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेल्या ‘भारतरत्न’ने सन्मानित करण्याचे आवाहन केले आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील चिखलफेक थांबवायची असेल, तर त्यांना ‘भारतरत्न’ने सन्मानित करा, असे ते म्हणाले. यावरून आता भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी संजय राऊतांना आव्हान दिले आहे. आता राऊत यांनी केंद्र सरकारवर केलेल्या टिकेवरून भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी संजय राऊतांवर टीका केली आहे.

पुढे भातखळकर यांनी टीका करत ‘इतक्या पराकोटीचे कोडगे वक्तव्य करण्यासाठी कोणत्या प्रतीचा गांजा लागतो हे राऊतच सांगू शकतात’, असा टोला संजय राऊतांना लगावला आहे. ‘सत्तेसाठी स्वा. सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसची धुणीभांडी करणाऱ्यांनी इतक्या मोठ्या बाता करू नये,’ असे भातखळकर यांनी संजय राऊत यांना ट्विट करून टोला लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा