Atul Londhe | “बाळासाहेब यांचं नाव घ्यायचं अन्…”; काँग्रेसचा शिंदे गटावर हल्ला

मुंबई :   सध्या अंधेरी (पूर्व) पोटनिवडणुकीच वारं सगळीकडे घुमू लागलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये मोठ्या हालचाली होताना दिसून येतं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजप पक्षाला बाळासाहेबांच्या शिवसेनेने (एकनाथ शिंदे गट) पाठिंबा दिला आहे. यावरून अनेक चर्चा रंगू लागल्या असून, अंधेरी पूर्व विधानसभेची जागा ही शिवसेनेची होती. मग बाळासाहेबांच्या शिवसेनेने आपला उमेदवार उभा न करता भाजपाच्या उमेदवाराला पांठिबा देण्याचा निर्णय का घेतला? , असा सवालही केला जात आहे.अशातच काँग्रेस पक्षाचे नेते अतुल लोंढे यांनी एकनाथ शिंदे गटावर हल्ला केला आहे.

काय म्हणाले अतुल लोंढे ?

बाळासाहेब यांचं नाव घायचं आणि बाळासाहेब यांनाच धोका द्यायचं काम भाजप आणि एकनाथ शिंदे गटाने केलं असल्याचं म्हणत अतुल लोंढे यांनी एकनाथ शिंदे गट आणि भाजप पक्षावर टीका केली आहे. अतुल लोंढे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. तुम्ही जर स्वत:ला शिवसेना मानता, भाजप देखील म्हणत की एकनाथ शिंदे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे. तर मग अंधेरी पूर्व विधानसभेची जागा ही शिवसेनेची होती. मग तुम्ही तुमचा उमेदवार का उभा केला नाही. भाजपाला का पाठिंबा दिला?, असा सवालही त्यांनी याठिकाणी उपस्थित केला आहे.

शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह आयोगाकडून गोठवण्यात आल्यानंतर पोटनिवडणुकीसाठी उद्धव ठाकरे याच्या शिवसेनेला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नावं आणि ‘मशाल’ हे चिन्ह देण्यात आलं आहे.तर एकनाथ शिंदे यांच्या गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नावं आणि ‘ढाल-तलवार’ हे चिन्ह देण्यात आलं आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरे गटाला मिळालेल्या ‘मशाल’ चिन्हाविरोधात दिल्लीच्या उच्च न्यायालयात समता पार्टीने एक याचिका दाखल केली असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे ठाकरे गटाच्या अडचणींमध्ये आणखिन वाढ झाली असल्याचं दिसून येत आहे. ही याचिका समता पार्टीचे अध्यक्ष उदय मंडल (Uday Mandal) यांनी उच्च न्यायालयात (High Court) दाखल केली आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.