Atul Save | “पालकमंत्री काळे की गोरे बीडच्या शेतकऱ्यांना आजच कळलं” ; पूजा मोरेंनी घेतला अतुल सावेंचा चांगलाच समाचार!

Atul Save | बीड : गेल्या दोन महिन्यांपासून महाराष्ट्रासह अनेक राज्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. यामुळे राज्यातील अनेक पिकांचं नुकसान झालं असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. तर बीड जिल्ह्यात मोठ्याप्रमाणावर अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे. परंतु या परिस्थितीत देखील पालकमंत्री अतुल सावे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर पाहणीसाठी गेले नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून याबाबत आंदोलन देखील करण्यात आले होत. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे (Atul Save) बेपत्ता आहेत, त्यांना शोधून काढणाऱ्या व्यक्तीला 51 रुपये बक्षीस देण्याचेही घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात आली होती. तर आज महाराष्ट्र दिनानिमित्त स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पूजा मोरे (Pooja More) यांनी पालकमंत्री अतुल सावे यांची भेट घेऊन चांगलाच समाचार घेतला आहे.

पालकमंत्री काळे की गोरे शेतकऱ्यांना आजच कळलं : पूजा मोरे (Guardian Minister black or white farmers know only today: Pooja More)

बीडचे पालकमंत्री अतुल सावे (Atul Save)यांनी आज ( 1मे) बीडच्या दौऱ्यावर असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पूजा मोरे यांनी पालकमंत्री गोरे आहेत की, काळे आहेत हे आज बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कळलं अशा शब्दात त्यांचा समाचार घेतला आहे. त्या गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे झालेलं शेतकऱ्यांच्या शेतीच्या नुकसानभरपाई आणि प्रश्नावरून पालकमंत्र्यांना भेटल्या होत्या. यावेळी पालकमंत्र्यांनी आणि पोलिसांनी माध्यमांना कॅमेरे बंद करायला देखील सांगितलं. तसचं मोरे यांनी तात्काळ शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी देखील केली.

दरम्यान, आज बीडचे पालकमंत्री अतुल सावे शासकीय ध्वजारोहणासाठी बीडमध्ये आले होते. परंतु, पुजा मोरे आणि त्याच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी सकाळपासूनच नजर कैदेत ठेवलं होतं. तसचं शासकीय कार्यक्रमात कोणताही विरोध होऊ नयेत म्हणून मोरे यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवत नजर कैदेत ठेवलं होतं असं सांगण्यात येत आहे. जिल्ह्यात मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले असताना देखील, पालकमंत्री यांना शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी वेळ नसल्याचा आरोप मोरे यांनी केला होता.

महत्वाच्या बातम्या-

You might also like

Comments are closed.