InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

अतुल सावे म्हणाले, हार-जीत होतच असते, कादरी म्हणाले,नेक्‍स्ट टाईम फाईट!

औरंगाबाद पूर्वमधून अतुल सावे यांनी विजय मिळवल्यानंतर प्रसार माध्यमांनी पहीली प्रतिक्रीया विचारली. त्याचवेळी पराभूत झालेले एमआयएमचे उमेदवार डॉ. गफ्फार कादरी तिथून जात असताना श्री. सावे यांनी त्यांचे हात हातात घेतले. श्री. सावे म्हणाले, की राजकारण आहे, असे जय-पराजय चालतच राहील. यावर कादरी यांनी त्यांच्या शेकहॅंडचा स्वीकार करत “नेक्‍स्ट टाईम फाईट’ असे उत्तर देत कादरी तेथून निघून गेले.

पूर्वचे उमेदवार अतुल सावे विजयानंतर मतमोजणी केंद्राबाहेर आले यावेळी माध्यमांनी त्यांना घेराव घालत प्रतिक्रिया विचारली. त्याच वेळी तिकडे पराभूत झालेले एमआयएमचे उमेदवार गफार कादरी हे घरी निघाले होते. तेव्हा कादरी यांनी सावे यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्याकडे बघितले व माध्यमे समोर आल्यामुळे कदाचित ते बोलणार नाही असे समजून कादरी तिथून निघाले होते.

Loading...

मात्र, सावे यांनी हे बघितले व त्यांनी तात्काळ बाजूला येत कादरी यांचा हातात हात घेतला व निवडणुका आहे, जिंकणे हरणे चालूच असते, असे सांगितले. कादरी यांनी सावे यांना शुभेच्छा देत, मान हलवत नेक्‍स्ट टाईम फाईट असे सांगत मतमोजणी केंद्रातून निघून गेले.

- Advertisement -

Loading...
You might also like
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.