Aurangabad | अब्दुल सत्तारांचा दौरा संपताच पंचनामे करणारे पथक देखील गायब

Aurangabad | औरंगाबाद : मराठवाडा (Marathwada) येथे परतीच्या पावसामुळे झालेल्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) औरंगाबाद (Aurangabad) येथे गेले होते. यावेळी त्यांनी पंचनामा करण्याचे आदेश दिले. मात्र अब्दुल सत्तार यांचा दौरा संपताच पंचनामे करणारे पथक देखील गायब झाले आहेत.

पंचनामे झाल्यावर 15 दिवसांत खात्यावर पैसे जमा करण्याची माहिती कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली होती. मात्र आता पंचनामे होण्यासाठीच वेळ होत असल्याने नुकसानभरपाई कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. मराठवाड्यात परतीच्या पावसाने 20 लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे आणखी एक आठवडा पंचनामे करण्यासाठी लागण्याची शक्यता आहे.

शनिवारी कृषिमंत्री पाहणीसाठी आल्याने सर्व प्रशासकीय यंत्रणा त्या ठिकाणी हजर झाली. यावेळी लवकरात-लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे निर्देश कृषीमंत्री यांनी दिले. पण दुसऱ्या दिवशी या अधिकाऱ्यांचे मोबाइल नॉट रिचेबल होते.

दरम्यान, रात्री 10 वाजेपर्यंत कृषिमंत्र्यांनी बनोटी ते फर्दापूर या भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे आदेश दिले. यावेळी महसूल आणि कृषी विभागाचे अधिकारी देखील उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.