Aurangabad | एकीकडे उद्धव ठाकरेंचा दौरा अन् विरोधकांची टीका तर औरंगाबादमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या
Aurangabad | औरंगाबाद : परतीच्या पावसामुळे मराठवाडा शेतकऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. यावर राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. मात्र, राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राज्यात अद्याप ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी परिस्थिती नसल्याचं म्हटलं आहे. तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल मराठवाडा दौरा केला. यावरुन सत्ताधारी टीका – टिप्पणी करत आहे. तर दुसरीकडे हे सर्व सुरु असतानाच औरंबाद (Aurangabad) येथे एका शेतकऱ्याने आत्महत्या (Farmer’s Sucide) केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.
पंडित एकनाथ निकम असं मयत शेतकऱ्याचे नाव असून त्याचं वय 47 वर्षे होतं. सतत पडत असलेल्या पावसाने पिके मातीमोल झाल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या पंडित यांनी लिंबाच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन मृत्यूला कवटाळले. शेतात झालेल्या नुकसानानंतर आपल्याकडे असलेली कर्जे तसेच उसनवारी फेडणार कशी या विवंचनेत पंडित निकम होते. तर गेल्या काही दिवसांपासून ते सतत याच विचारत असायचे.
दरम्यान, रविवारी शेतात कामासाठी जातो म्हणून ते निघून गेले. मात्र तिकडेच लिंबाच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन त्यांनी मृत्यूला कवटाळलं. सायंकाळी डोंगरातून बकऱ्या चारून घरी परतणाऱ्या गुराख्यास निकम गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यांनी तातडीने गावात माहिती दिली. यानंतर, नातेवाईक, गावकरी यांनी घटनास्थळी धाव घेतली.
नादरपूर शिवारात गट नंबर 121 मध्ये शेती आहे. शेतात उधारीवर बियाणे आणून मका आणि कापूस पिकाची लागवड केली होती. जून-जुलै महिन्यात पाऊस चांगला झाल्याने पिके जोमात होती. कापसाला चांगला भाव मिळाल्याने कापसाला देखील चांगला भाव मिळाला. त्यामुळे उधारी फिटेल या आशेवर पंडित निकम यांनी जोमाने पिकांची मशागत व मेहनत केली. मात्र, शेवटी परतीच्या अतिपावसाने पिकांना मोठा फटका बसला. कापूस पाण्याखाली गेला असून मकाला कोंब फुटली.
महत्वाच्या बातम्या :
- Eknath Shinde | “…उद्भवजींचा दौरा तासाभरात झाला”, शिंदे गटाने काव्य करत उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर साधला निशाणा
- Anushka Sharma | भारताने पाकिस्तानवर मात केल्यानंतर अनुष्का शर्माची विराटसाठी खास पोस्ट, म्हणाली…
- Bacchu Kadu | “… अन्यथा मी ‘त्यांना’ कायम हि** म्हणेल”, बच्चू कडू संतापले
- Raj Thackeray । पाकिस्तानविरुद्ध भारताने विजय मिळवल्यानंतर राज ठाकरे म्हणाले, “तोड नाही…”
- IND VS PAK । पाकिस्तानला हरवल्यानंतर रोहित शर्माने केले मोठे वक्तव्य, कोहलीला दिला सलाम
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.