प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली औरंगाबाद विभागाची बैठक

भारतीय जनता पक्षाची संघटनात्मक बाबी आणि स्थानिक स्वराज्य संस्थेतील निवडणुकी विषयी विभाग निहाय बैठका सुरु आहेत. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक विभागात ही बैठक घेतल्या जात आहे. सोमवारी (ता.9) औरंगाबाद विभागाच्या बैठक सकाळी दहा वजेपासून सुरु झाली आहे.

भाजपच्या जिल्हा कार्यालयात ही बैठक घेण्यात येत आहे. या बैठकीत आगमी काळात होणाऱ्या पदवधीर मतदारसंघातील निवडणुकीची तयारी. तसेच महानगरपालिका निवडणुकी संदर्भात चर्चा होणार आहे. दिवसभर ही बैठक सुरु राहणार असून यात राज्य, शहर, जिल्हा कार्यकारिणी, युवा मोर्चा, ओबीसी मोर्चा, यासह विविध मोर्चाची स्वतंत्र बैठक आणि चर्चा प्रदेशाध्यक्ष करीत आहेत. जळगाव येथील बैठक आटोपून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे रविवारी औरंगाबादेत मुक्‍कामी होते.

या बैठकीतून संघटनात्मक कामाची माहिती प्रदेशाध्यक्ष जाणून घेणार आहे. यासह मराठवाड्यातील सर्व जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष, विविध मोर्चाचे प्रमुख पदाधिकाऱ्यांची चर्चा होणार आहे. युती तुल्यामूळे आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपतर्फे स्वबळाच्या हिशोबाने निवडुन लढवली जाणार आहे. याचेही नियोजन आणि चर्चा या बैठकीत केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या बैठकीस सर्व शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष यासाह लोकप्रतिनिधी उपस्थित आहेत.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.