औरंगाबाद – किती दिवस कंपन्या ‘बंद’ ठेवाव्यात; उद्योजकांचा आक्रमक प्रश्न

औरंगाबाद : गुरुवारी मराठा आरक्षणाकरिता पुकारण्यात आलेला महाराष्ट्र बंद काही ठिकाणी शांततेत पाळण्यात आला, तर काही ठिकाणी या बंदला गालबोट लागलं. पुणे, नाशिक, औरंगाबाद या ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागलं. या बंद दरम्यान आंदोलकांनी औरंगाबाद येथील वाळूज औद्योगिक परिसरातील कार्यालयांचं आणि मालमत्तेचं प्रचंड नुकसान केले. त्यामुळे उद्योजक आक्रमक झाले आहेत. नुकसानीचा आढावा घेण्याकरिता उद्योजकांकडून बैठक बोलावण्यात आली. या बैठकीस सुमारे १००० उद्योजक हजर होते.

मराठा आंदोलकांकडून बंदच्या दरम्यान औद्योगिक परिसरात घुसून मोठी तोडफोड आणि जाळपोळ केली. त्यामुळे याचा फटका औद्योगिक परिसरातील ६० हून अधिक मोठ्या कंपन्या आणि १५ हून अधिक लहान कंपन्यांना बसला आहे. शिवाय, मराठा आंदोलनादरम्यान उद्योग बंद राहिल्यानेही मोठे नुकसान झाले आहे.

या बंदच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्रींनी लक्ष द्यावे अशी मागणी उद्योजकांकडून करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी याठिकाणी येऊन नुकसानीची पाहणी करावी. प्रशासन जर सुरक्षा देवू शकत नसेल तर कंपन्या किती दिवस बंद ठेवाव्यात, असा प्रश्नही उद्योजकांकडून विचारण्यात आला. दरम्यान, कालच्या तोडफोड प्रकरणी पोलिसांनी २० ते २५ संशयीत आंदोलकांना अटक केली आहे. सीसीटीव्हीचे फुटेज तपासून बाकी आरोपींना अटक करण्यात येणार आहे.

मराठा आरक्षणासाठी आणखी एकाची आत्महत्या; औरंगाबादमधील घटना

‘महाराष्ट्र बंद’ डोणजे गावात ठिय्या आंदोलन

मेधा कुलकर्णींच्या निषेधार्थ पुण्यात ‘स्टंट’ आंदोलन

महत्वाच्या बातम्या

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.