InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

पुण्याच्या वाहतूक समस्येवर तोडगा काढणार : गिरीश बापट

लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोरदार सुरु आहे. पुणे लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांनी प्रचारात आघाडी घेतलेली पाहायला मिळत आहे.गिरीश बापट यांनी शहरातील व्यापारी, हॉटेल मालक तसेच रिक्षाचालक संघटनांच्या सदस्यांची भेट घेवून…

टीव्ही मालिकांमधून प्रचार करणाऱ्या निर्मात्यांना निवडणूक आयोगाची नोटीस

दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील मालिकांमधून विविध योजनांचा प्रचार केल्याच्या तक्रारीची दखल राज्य निवडणूक आयोगाने घेतली आहे, असा प्रचार करणाऱ्या झी टीव्ही व अँड टीव्हीवरील मालिकांच्या निर्मात्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असल्याची माहिती…

चौथ्या टप्प्यातील १७ मतदारसंघात ४५३ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे दाखल

लोकसभा निवडणूक 2019 अंतर्गत राज्यातील चौथ्या टप्प्यातील 17 मतदारसंघात अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मंगळवार दि. 9 एप्रिल रोजी 453 उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे दाखल केली असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली.…

राज्यात पहिल्या टप्प्यात ७ मतदारसंघात साडेपाचपर्यंत ५५.९७ टक्के मतदान

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात आज रोजी झालेल्या मतदानात राज्यातील ७ मतदारसंघात सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत ५५.९७ टक्के मतदान झाले. सायंकाळी ६ नंतरही काही मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा असल्याने उशिरापर्यंत मतदान सुरु होते, अशी…

दानवेंनी केली निवडणूक आयोगाची दिशाभूल ? पदवीबद्दल दिलेल्या माहितीत अजब तफावत

जालना लोकसभा मतदारसंघातील युतीचे उमेदवार खा. रावसाहेब दानवे यांनी निवडणूक आयोगाची दिशाभूल केल्याचा आक्षेप वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार शरदचंद्र वानखेडे यांनी निवडणूक अधिकार्यांकडे दाखल केला होता. 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी…

निवडणूक‍ आयोगामार्फत राजकीय पक्षांना प्रक्षेपण आणि प्रसारण तासांचे वाटप

लोकसभा निवडणुकांसाठी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पक्षांसाठी दूरदर्शन आणि आकाशवाणीवर प्रचारासाठी भारत निवडणूक आयोगामार्फत प्रक्षेपण आणि प्रसारण तासांचे वाटप करण्यात आले आहे. आयोगामार्फत 7 राष्ट्रीय आणि 52 राज्यस्तरीय पक्षांसाठी दूरदर्शन आणि…

आचारसंहितेचा धाक दाखवून सराफाला लुटणारे उदगीरचे चौघे पोलीस बडतर्फ – लातूर जिल्हा…

आचारसंहितेचा धाक दाखवून उदगीर (लातूर) येथे सराफी व्यापाऱ्याची काल 1.5 लाख रुपयांची लूट केल्याबाबत तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार 4 पोलीस कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आले असून त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे, अशी माहिती विशेष…

‘स्टिंग ऑपरेशन’ प्रकरणात रामदास तडस यांना कारणे दाखवा नोटीस – वर्धा…

एका खासगी वृत्तवाहिनीने केलेल्या 'स्टिंग ऑपरेशन'मध्ये वर्धा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार रामदास तडस यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या तक्रारीवरून श्री. तडस यांना वर्ध्याचे जिल्हाधिकारी यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे, अशी माहिती मुख्य…

मतदानासाठी मतदार यादीत नाव असणे बंधनकारक

मतदार यादीत नाव नसले तरी आधार कार्ड किंवा मतदार ओळखपत्र दाखवून चॅलेंज वोटच्या तरतुदीनुसार मतदान करता येईल, हे विधान वस्तुस्थितीशी विसंगत असून मतदार यादीत नाव असल्याशिवाय कोणालाही मतदान करता येणार नाही. तसेच प्रदत्त मत (टेंडर वोट) बाबतही…

तिसऱ्या टप्प्यासाठी ३९३ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे दाखल

लोकसभा निवडणूक 2019 अंतर्गत राज्यातील तिसऱ्या टप्प्याअंतर्गत नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या आजच्या अखेरच्या दिवशी 14 मतदारसंघात 197 उमेदवारांनी तर आजपर्यंत एकूण 393 उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत. चौथ्या टप्प्यासाठी आज 16…