प्रशासनाची सज्जता; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

E0A4A8E0A4BFE0A4B5E0A4A1E0A4A3E0A582E0A495 E0A4AAE0A582E0A4B0E0A58DE0A4B5E0A4A4E0A4AFE0A4BEE0A4B0E0A580 E0A486E0A4A2E0A4BEE0A4B5E0A4BE E0A5AA scaled D3fqRq प्रशासनाची सज्जता; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

छत्रपती संभाजीनगर, दि.१७ (जिमाका): लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने १९- औरंगाबाद लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक प्रक्रिया दि.१८ पासून सुरु होणार आहे. त्याअनुषंगाने अधिसूचना प्रसिद्ध केली जाईल. दरम्यान ही सर्व प्रक्रिया नामनिर्देशनाने सुरु होणार असून त्यासाठी प्रशासनाने सर्व सज्जता केली असून सर्व पूर्वतयारीचा अंतिम आढावा आज जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी आज घेतला. … Read more

बीडमध्ये निवडणूक पार्श्वभूमीवर अवैध मद्यविक्री विरोधात मोहीम ९२ गुन्हे दाखल

IMG 20240417 WA0111 F3NiVh बीडमध्ये निवडणूक पार्श्वभूमीवर अवैध मद्यविक्री विरोधात मोहीम ९२ गुन्हे दाखल

बीड दि. १७ (जिमाका ): लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या  पार्श्वभूमीवर बीड लोकसभा मतदारसंघाच्या क्षेत्रात अवैध मद्य वाहतूक तसेच विक्री यावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे मोहीम राबविण्यात येत असून आतापर्यंत या अंतर्गत 92 प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर लगेच आचारसंहिता अमलात आली आणि त्यासोबतच राज्य उत्पादन शुल्क खात्यातर्फे या प्रकारच्या मोहिमेला … Read more

नांदेडमध्ये मतदार चिठ्ठी वाटप गतीने सुरू ; १८ ते २१ एप्रिल ज्येष्ठ व दिव्यांगाचे मतदान

IMG 5252 PNJCeD नांदेडमध्ये मतदार चिठ्ठी वाटप गतीने सुरू ; १८ ते २१ एप्रिल ज्येष्ठ व दिव्यांगाचे मतदान

नांदेड दि. १७ : निवडणूक आयोगातर्फे मतदारांना मतदार माहिती चिठ्ठी अर्थात पोल चीट (Voter Information Slip ) वाटप करण्यात येते. या मतदार चिठ्ठीमध्ये मतदाराचे नाव, परिसर, केंद्र कोणते, यादी क्रमांक, भाग क्रमांक, रुम क्रमांक इत्यादी आवश्यक माहिती आहे. नांदेड मतदार संघात मतदार चिठ्ठी वाटप गतीने सुरू असून जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी अशा काही मतदारांच्या घरी … Read more

बीड लोकसभा मतदारसंघासाठी उद्यापासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास प्रारंभ

बीड, दि. १७ ( जिमाका ): लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 अंतर्गत  39 बीड लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात सोमवार, दि. १३ मे रोजी मतदान होणार आहे. यासाठी उमेदवाराकडून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया  उद्या, गुरुवार दि. १८ एप्रिल पासून सुरु होत आहे. गुरूवार 18 रोजी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध होत आहे. तसेच याच दिवसापासून दि. 25 एप्रिल … Read more

मतदान जनजागृतीच्‍या एलएईडी रथास जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्‍ते हिरवा झेंडा

IMG 5204 मतदान जनजागृतीच्‍या एलएईडी रथास जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्‍ते हिरवा झेंडा

नांदेड, दि. १७ : लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जिल्हा निवडणूक कार्यालयामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून मतदान जनजागृतीसाठी एलईडी चित्ररथ तयार करण्यात आले आहेत. एलएईडी रथाचे आज जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या परिसरातून जिल्हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी अभिजीत राऊत, स्वीपचे नोडल अधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल, मनपा आयुक्त डॉ. … Read more

पहिल्या टप्प्यात १.४१ लाख नवमतदार बजावणार मतदानाचा हक्क

मुंबई, दि. १७ :लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या मतदारसंघात 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत नवमतदारांची संख्या लक्षणीय असून यंदा 18-19 या वयोगटातील 1 लाख 41 हजार 457 नवमतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. नवमतदारांनी मतदान करण्याचे आवाहन मुख्य निवडणूक कार्यालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय … Read more

राज्यपालांनी घेतले प्रभू श्री रामाचे दर्शन; रामनवमीच्या दिल्या शुभेच्छा  

Hon Governor Bais visits Ram Mandir 2 राज्यपालांनी घेतले प्रभू श्री रामाचे दर्शन; रामनवमीच्या दिल्या शुभेच्छा  

मुंबई, दि. १७ : रामनवमीनिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी राजभवनातील श्रीगुंडी देवी मंदिर परिसरातील राममंदिरात जाऊन प्रभू श्री रामाचे दर्शन घेतले. राज्यपालांनी उपस्थितांसह प्रभू रामाची माध्यान्ह आरती केली. राज्यपालांच्या वतीने सर्व उपस्थितांना यावेळी प्रसाद वाटप करण्यात आले. राज्यपाल श्री.बैस यांनी सर्वांना रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या. ०००  

जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला संपूर्ण यंत्रणेचा आढावा

IMG 20240417 WA0122 brOfjz जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला संपूर्ण यंत्रणेचा आढावा

बीड ,दि. १७ (जिमाका) :  लोकसभा सार्वत्रिक निवडणुका सुरू झाल्या आहेत.  39 बीड लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात सोमवार दिनांक 13 मे रोजी मतदान होणार असून यासाठी उमेदवाराकडून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया गुरुवार दिनांक 18 एप्रिलपासून सुरु होणार आहे. या धर्तीवर आज जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालय परिसराची पाहणी … Read more

संवेदनशील भागातील मतदान पथके रवाना

गडचिरोली दि. 16 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 19 एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानाकरिता 12-गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदार संघातील संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर मतदान पथके रवाना करण्यास आज सुरूवात करण्यात आली. गडचिरोलीतील विविध संवेदनशील आणि अतिसंवेदनशील अशा 65 मतदान केंद्रावरील 72 निवडणूक पथकाच्या 267 मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांना ईव्हीएम आणि इतर युनिटसह आज सकाळी भारतीय वायुसेना आणि … Read more

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत महाराष्ट्रातील ८७ हून अधिक उमेदवार यशस्वी

नवी दिल्‍ली, 23: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत देशातील एकूण 1016 उमेदवार यशस्वी झाले आहेत. यापैकी राज्यातील 87 हून अधिक उमदेवारांनी घवघवीत यश मिळविले आहे. एकूण निवड झालेल्या उमेदवारांपैकी जवळपास 8.6 टक्के महाराष्ट्रातून आहेत. राज्यातून समीर प्रकाश खोडे प्रथम आले असून देशात त्यांनी 42 वा क्रमांक पटकाविला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाचा वर्ष 2023 च्या नागरी … Read more

६.४० कोटींच्या कर चोरीप्रकरणी जीएसटी विभागाकडून दोन संचालकांना अटक

मुंबई, दि. १६ : महाराष्ट्र शासनाच्या वस्तू व सेवाकर विभागाने कर चुकवेगिरी प्रकरणात ६ कोटी ४० लाख रुपयांचा घोटाळा उघडकीस आणला आहे. बोगस बिलांसंदर्भात जीएसटी विभागाकडून सुरु असलेल्या घडक मोहिमेअंतर्गत कमलेश बाबुलाल जैन (वय ६१), आणि भावना कमलेश जैन (वय ६१) या दोन संचालकांना आज १६ एप्रिल रोजी अटक करण्यात आली, अशी माहिती राज्यकर उपायुक्त राजेंद्र टिळेकर यांनी … Read more

दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदारांसाठी निवडणूक आयोगाचा पुढाकार

मुंबई दि. 16 : जे दिव्यांग नागरिक मतदान केंद्रावर येऊन मताधिकार बजावू इच्छितात, त्यांच्यासाठी भारत निवडणूक आयोगामार्फत स्वयंसेवक व व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात येणार आहे. या सुविधा मिळण्यासाठी दिव्यांग मतदारांनी आपले नाव Saksham-ECI या अॅपवर चिन्हांकित करणे आवश्यक आहे.  या लोकसभा निवडणुकीत सर्व मतदान केंद्रे तळमजल्यावर ठेवण्यात आलेली आहेत. त्यामुळे दिव्यांग मतदारांना ये-जा करणे सोयीचे होऊ शकेल. दिनांक १२ एप्रिल २०२४ रोजीच्या … Read more

मुंबईतील एसएनडीटी महिला विद्यापीठात ‘स्वीप’तर्फे मतदान जनजागृती कार्यक्रम

5d9e1eba b17a 495c ac29 45dbbdead37f 1024x461 JY6wpU मुंबईतील एसएनडीटी महिला विद्यापीठात ‘स्वीप’तर्फे मतदान जनजागृती कार्यक्रम

मुंबई, दि. १६ : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेप्रमाणे नवीन पात्र मतदारांची नोंदणी वाढवणे तसेच जिल्ह्यामध्ये मतदानाची टक्केवारी वाढवण्याच्या दृष्टीने जनजागृती करण्यासाठी स्वीप अर्थात मतदार जागरूकता आणि सहभाग कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांतर्गत मुंबई शहर जिल्ह्यातील एसएनडीटी महिला विद्यापीठात नुकताच एक कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात एसएनडीटी महाविद्यालयाच्या … Read more

मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात खर्च निरीक्षण समितीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

61326ff7 06f3 4d1c aaf5 bff9a3b082af 1024x585 MYhLEN मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात खर्च निरीक्षण समितीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

मुंबई, दि. १६ : आपल्या दैनंदिन शासकीय कामकाजापेक्षा निवडणुकीचे काम जबाबदारीचे आहे. हे कामकाज करताना निवडणूक आयोगाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे. प्रशिक्षण काळजीपूर्वक समजून घेवून निवडणुकीच्या कामास अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सर्वोच्च प्राधान्य द्यावे , असे कोकण विभागाचे अपर विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी विकास पानसरे यांनी सांगितले. निवडणूक विषयक नियमांचा अभ्यास करून प्रामाणिकपणे काम करावे. अधिकारी व … Read more

वस्तू व सेवा कर संकलनात महाराष्ट्राचा उच्चांक; तीन लक्ष कोटींचा टप्पा पार

मुंबई, दि. 16 :  महाराष्ट्र राज्याने वस्तू व सेवा कर संकलनात सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात उच्चांक गाठलेला असून वस्तू व सेवा कर प्रणाली लागू झाल्यापासून पहिल्यांदाच रूपये ३ लक्ष कोटींचा टप्पा पार केलेला आहे. या वर्षी राज्याचे वस्तू व सेवा कर संकलन, रूपये ३.२ लक्ष कोटी एवढे झाले असून गतवर्षीच्या तुलनेत त्यामध्ये १८ टक्के एवढी घसघशीत वाढ नोंदवलेली असल्याची माहिती … Read more