InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

कांकरिया परिसरातून ५० बॉम्ब जप्त

पश्चिम बंगालमधील भाटपारा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कांकिनारा भागातून जवळपास ५० बॉम्ब जप्त करण्यात आले आहेत. मात्र सध्या येथीप परिस्थिती साधारण असल्याची माहिती उत्तर २४ परगनात बराकपूर विभाग-१ चे पोलिस आयुक्त अजय ठाकुर यांनी दिली.लोकसभा…

बलात्काऱ्यास ‘शरियत’ प्रमाणे फाशीची शिक्षा द्यावी

अवघ्या सहा वर्षाच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करत, तिची हत्या करणाऱ्या नाजिल या आरोपीला उत्तर प्रदेशमधील रामपुरमध्ये पोलिसांनी अटक केली. रामपूरचे पोलिस अधीक्षक आणि एनकाउंटर स्पेशलिस्ट अजय पाल शर्मा यांनी नाजिलच्या दोन्ही पायांवर…

सपा प्रमुख मुलायम सिंह यादव रूग्णालयात दाखल

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टी प्रमुख मुलायम सिंह यादव यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.गाजियाबादमधील कौशांबी येथील यशोदा रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहे. मागिल काही दिवसांपासून त्यांची तब्येत सातत्याने…

टँकरद्वारे राज्याला पाणीपुरवठा करावं लागतो, लाज वाटायला हवी- जयंत पाटील

दुष्काळामध्ये तुम्ही राज्यात ६ हजार ५९७ टँकरद्वारे राज्याला पाणीपुरवठा करत होता ही काय भूषणावह गोष्ट आहे का ? तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. ‘राज्याला दुष्काळमुक्त करू’ असं म्हणून तुम्ही सत्तेत आला होतात आणि आता पाच वर्षांनी तुम्हाला राज्याला…

पुणे महापालिकेतील गाव पातळीवरील निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादीला यश

पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या ११ गावांच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ४२ (अ) पुरूषांमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गणेश ढोरे आणि (ब) महिलांमधून भाजपाच्या अश्विनी पोकळे विजयी झाल्या आहेत.पुणे महानगरपालिकेत नव्याने…

मुख्यमंत्रिपदाची स्वप्ने पाहणाऱ्यांनी शेतकऱ्यांचा क्षोभ शमवावा; उद्धव यांचे आवाहन

‘‘मुख्यमंत्री कोण होईल, याची मला पर्वा नाही. मुख्यमंत्रिपदाची स्वप्ने पाहणाऱ्यांनी शेतकऱ्यांचा क्षोभ शमवावा. अन्यथा, ते सत्तेची आसने जाळून खाक करतील,’’ असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी दिला.‘‘मुख्यमंत्री आमचा होणार…

विखे, क्षीरसागर यांना मंत्रीपद म्हणजे राजकीय भ्रष्टाचार

राधाकृष्ण विखे पाटील, जयदत्त क्षीरसागर यांसारख्या विरोधी पक्षांच्या नेत्यांना फोडाफोडी करून सहा महिन्यांसाठी त्यांना मंत्रिपद देणे हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेला राजकीय भ्रष्टाचार आहे.लोकप्रतिनिधींच्या फोडाफोडीचे प्रकार होऊ…

विजय वडेट्टीवार यांची विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड

विजय वडेट्टीवार यांची विधानसभेच्या विरोधीपक्षनेतेपदी निवड झाली. राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर विधानसभेच्या विरोधीपक्षनेतेपदी कोण बसणार याचे अंदाज वर्तवले जात होते. ज्यानंतर विजय वडेट्टीवार यांचे नाव समोर आले. त्याच…

झारखंड लिंचिंग आणि हिंसाचाराचा कारखाना बनला- गुलाम नबी आझाद

सोमवारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी केंद्र सरकार आणि भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्लाबोल केला. झारखंड लिंचिंग आणि हिंसाचाराचा कारखाना बनला असून दर आठवड्याला तिथे दलित आणि मुस्लिमांची हत्या…

कॉग्रेस नेत्याने केली मोदींची ‘गंदी नाली’शी तुलना

संसदेमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. यावेळी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर दोन्ही सदनांमध्ये आभार प्रस्ताववर चर्चा सुरू आहे. यावेळी लोकसभेमध्ये काही महत्वाची विधेयके सादर करण्यात आली. याचबरोबर काँग्रेसच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी…