‘महिला मतदार; मतदान करणार’ जिल्हा प्रशासनाचा उपक्रम; महिला मतदारांच्या जनजागृतीसाठी विशेष मोहीम

छत्रपती संभाजीनगर, दि.१६(जिमाका):- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मध्ये महिला मतदारांची मतदानासाठीची टक्केवारी वाढावी यासाठी महिला मतदारांच्या जनजागृतीसाठी ‘महिला मतदार; मतदान करणार’ ही विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून हे अभियान राबविले जाणार आहे             जिल्ह्यात मतदार जनजागृतीचे विविध उपक्रम स्वीप अंतर्गत राबविण्यात येत आहेत. त्यात महिला मतदारांपर्यंत विशेष … Read more

निवडणूक आयोगाकडून राज्यात ४२१ कोटींचा मुद्देमाल जप्त

मुंबई, दि. १६ : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात १६ मार्चपासून आदर्श आचारसंहिता लागू आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागांनी राज्यात १ मार्च ते ११ एप्रिल दरम्यान एकूण ४२१ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात रोख रक्कम, दारू, ड्रग्ज, फ्रिबीज, मौल्यवान धातूंचा इतर बाबींचा समावेश आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक … Read more

मुंबई शहर जिल्ह्यात सी-व्हिजिल ॲपवर ६१ तक्रारी प्राप्त, सर्व तक्रारीचे निवारण

मुंबई, दि. १६ : लोकसभा सार्वत्रिक निवडणूकची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन व्हावे आणि निवडणुका शांततेत आणि मुक्त वातावरणात पार पाडण्याचे भारत निवडणूक आयोगासमोरचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी आयोगाने सिटीजन व्हिजिलन्स अंतर्गत ‘सी-व्हिजिल’ हे नवे मोबाईल ॲप देशातील सर्व नागरिकांसाठी उपलब्ध केले आहे. मुंबई शहर जिल्ह्यात १६ मार्च पासून आज पर्यंत ६१ … Read more

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मतदारांनी सक्रिय सहभाग नोंदवावा – मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम

१९ एप्रिल रोजी मतदान ; १० हजार ६५२ मतदान केंद्र मुंबई, दि. 16 : महाराष्ट्रात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या पाच लोकसभा मतदार संघामध्ये दि. 19 एप्रिल  रोजी मतदान घेण्यात येणार आहे. त्यासाठी एकूण 10,652 मतदान केंद्रांची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असून या निवडणुकीत 95,54,667 मतदार आपला … Read more

‘दिलखुलास’मध्ये पुणे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांची ‘लोकसभा निवडणुकांची तयारी’ या विषयावर गुरुवार व शुक्रवारी मुलाखत

मुंबई, दि. १६ : ‘लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ पुणे जिल्हा प्रशासन सज्ज’ याविषयी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांची माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’  कार्यक्रमात गुरुवार दि. १८  व शुक्रवार १९ दि. एप्रिल २०२४  रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल अॅपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत मुलाखत प्रसारित होणार आहे. पुणे जिल्ह्यात  असलेले  लोकसभा मतदार … Read more

वैद्यकीय क्षेत्रात काम करताना रुग्णाच्या चिंता समजून घेऊन दयाळूपणाने वागा – राज्यपाल रमेश बैस यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

jalgaon2 1024x682 dhDA0d वैद्यकीय क्षेत्रात काम करताना रुग्णाच्या चिंता समजून घेऊन दयाळूपणाने वागा – राज्यपाल रमेश बैस यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

जळगाव, दिनांक 16 एप्रिल (जिमाका) : जळगावाच्या शासकीय वैद्यकीय माहाविद्यालयातून उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन कार्यक्रमाच्या माध्यमातून उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी वैद्यकीय सेवा देताना रुग्णाना पहिले औषध हे दयाळूपणाचे द्या. प्रत्येक रुग्णाप्रती दयाळू रहा. त्यांच्या चिंता समजून घ्या आणि प्रत्येक रुग्णाशी भावनिक नाते निर्माण करा. हेच सूत्र आपल्याला उत्कृष्ट डॉक्टर बनवणार असल्याने महाविद्यालयातून बाहेर पडताना हा … Read more

‘दिलखुलास’ कार्यक्रमात भंडारा जिल्हा स्वीपचे नोडल अधिकारी रवींद्र सलामे यांची बुधवारी मुलाखत

मुंबई, दि. १६ :  माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास‘ कार्यक्रमात ‘मतदार जनजागृती‘ या विषयासंदर्भात भंडारा जिल्ह्याचे स्वीप नोडल अधिकारी तथा माध्यमिक शिक्षणाधिकारी रवींद्र सलामे यांची घेतलेली मुलाखत बुधवार दि. १७  एप्रिल २०२४ रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआर‘ या मोबाईल ॲपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे.  प्रसारित होणार आहे. ही मुलाखत भंडारा  जिल्हा माहिती … Read more

विविध ‘मोबाईल ॲप’च्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा

सातारा 16 :-   भारत निवडणूक आयोगाने विविध मोबाईल ॲपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत.  तरी या ॲपचा जिल्ह्यातील मतदारांनी व उमेदवारांनी वापर करून  आवश्यक असलेली माहिती उपलब्ध करून घ्यावी, असे आवाहन  जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे. c-VIGIL (Citizen’s Vigilance Initiative on Electoral malpractices) हे भारतीय निवडणूक आयोगाने … Read more

वेगवेगळ्या थीमवर जिल्ह्यात ८५ मतदान केंद्रे

चंद्रपूर, दि. 16 : 19 एप्रिल रोजी चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात होणाऱ्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे SVEEP (Systematic Voter’s Education and Electoral Participation) अंतर्गत वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत असून मतदारांना आकर्षित करण्यासाठी जिल्ह्यात 85 मतदान केंद्रे वेगवेगळ्या थीमवर सजविली जाणार आहेत. 2019 च्या निवडणुकीमध्ये ज्या मतदान केंद्रावरील मतदान 50 टक्क्यांपेक्षा कमी होते किंवा ज्या मतदान केंद्रावरील … Read more

गडचिरोलीत ६८ मतदान केंद्रावर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट

GLRQFxraMAA 6L EX21m3 गडचिरोलीत ६८ मतदान केंद्रावर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट

गडचिरोली दि. १६ : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी १९ एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानाकरिता १२-गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदार संघातील संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर मतदान पथके रवाना करण्यास आज सुरूवात करण्यात आली. गडचिरोलीतील विविध संवेदनशील आणि अतिसंवेदनशील अशा ६८ मतदान केंद्रावरील ७२ निवडणूक पथकाच्या २९५ मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांना ईव्हीएम आणि इतर युनिटसह आज सकाळी भारतीय वायुसेना आणि … Read more

निवडणूक कालावधीत आपत्ती व्यवस्थापन यंत्रणाही असणार सज्ज; मतदारांना कोणतीही अडचण उद्भवू नये, यासाठी प्रशासनाने उचलली पावले

मुंबई उपनगर, दि. 15 : मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघात  सार्वत्रिक निवडणुकीची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे. या तयारीचाच एक भाग म्हणून जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन तयारीचा आढावा घेऊन निवडणूक कालावधीत यंत्रणेने सुसज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्हा निवडणूक अधिकारी श्री क्षीरसागर यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, बृहन्मुंबई महानगरपालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभाग … Read more

निवडणुकीसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी आता वेल्फेअर ऑफिसर – जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर

मुंबई उपनगर, दि. १५ : मुंबई उपनगर जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची तयारी आता युद्धपातळीवर सुरू आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार  निवडणूक प्रक्रिया राबविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जवळपास ५० हजार अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती केली आहे. निवडणूक कालावधीत या कर्मचाऱ्यांना कोणतीही समस्या उद्भवू नये यासाठी आता प्रत्येक विधानसभा मतदारसंघ निहाय कल्याण अधिकारी अर्थात वेल्फेअर ऑफिसर नियुक्त करण्यात आले … Read more

नागरिकांना मतदानास प्रवृत्त करण्यासाठी सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करावा – जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर

मुंबई उपनगर, दि. 15 : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील नागरिकांनी अधिकाधिक संख्येने मतदान करण्यासाठी सर्व यंत्रणांनी तयार केलेल्या कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करतांनाच सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करून घ्यावा, असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिले. मुंबई उपनगर जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी नियुक्त जिल्हास्तरीय स्वीप समितीची बैठक आज दुपारी … Read more

२६ – मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातील राजकीय प्रतिनिधींसोबत बैठक

            मुंबई उपनगर दि. 15 : निवडणूक आचारसंहिता काळात सर्व राजकीय पक्षांनी भारत निवडणूक आयोगाच्या आदर्श आचारसंहितेचे पालन करावे आणि निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन 26- मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी पंकज देवरे यांनी केले.             लोकसभा निवडणूक प्रक्रिया आणि राजकीय पक्षांनी पाळावयाची आचारसंहिता याबाबत माहिती देण्यासाठी 26- … Read more

मतदारांनो ! तुम्ही सुध्दा जिंकू शकता बाईक, रेसींग सायकल आणि ॲन्ड्राईड मोबाईल

E0A4B8E0A58DE0A4B5E0A580E0A4AA E0A4ACE0A495E0A58DE0A4B7E0A580E0A4B8 E0A489E0A4AAE0A495E0A58DE0A4B0E0A4AE vP0PJc मतदारांनो ! तुम्ही सुध्दा जिंकू शकता बाईक, रेसींग सायकल आणि ॲन्ड्राईड मोबाईल

बस्स…. मतदान करून सेल्फी अपलोड करा चंद्रपूर, दि. 15 : देशाच्या प्रगतीसाठी, ध्येयधोरणे ठरविण्यासाठी मतदान करून आपला सहभाग लोकशाही प्रक्रियेमध्ये नोंदविणे अत्यंत महत्वाचे आहे.  13 – चंद्रपूर लोकसभा मतदार संघाची निवडणूक 19 एप्रिल 2024 रोजी 2118 मतदान केंद्रावर होणार असून सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. या निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी मतदान … Read more