लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात २५८ उमेदवार रिंगणात

मुंबई, दि. 22 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील 11 मतदारसंघात नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यात 317 उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले होते. त्यातील काही उमेदवारांनी माघार घेतल्याने आता 258 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. तिसऱ्या टप्प्यातील अंतिम निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची संख्या : रायगड 13, … Read more

मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी २३ एप्रिलपर्यंत नावनोंदणी करता येणार – जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर

मुंबई, दि. २२ : मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी मतदार यादीत नाव असणे आवश्यक असते. मुंबई उपनगर जिल्ह्यातील अद्याप मतदार म्हणून नावनोंदणी केली नाही आणि पहिल्यांदा नव्याने नाव नोंदणी करू इच्छिणाऱ्या बेघर, देहव्यवसाय करणारे, तृतीयपंथी, भटक्या विमुक्त जाती-जमाती या प्रवर्गातील नागरिक हे २३ एप्रिल पर्यंत ऑनलाईन तसेच ऑफलाईन पद्धतीने कोणत्याही ओळखपत्राविना स्व-घोषणापत्राद्वारे नाव नोंदवू शकणार असल्याची माहिती … Read more

कुर्ला वाहतूक नियंत्रण कक्षात मतदान जनजागृतीचा अभिनव उपक्रम

मुंबई उपनगर, दि. 22 : जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याअनुषंगाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कुर्ला- नेहरूनगर आगार येथे सूचना केंद्रातून बस स्थानकावरील सर्व प्रवाशांनी कृपया इकडे लक्ष द्या! 20 मे 2024 रोजी आपल्या मतदान केंद्रावर जाऊन अवश्य मतदान करा!! … Read more

दिव्यांग आणि वयोवृद्धांना मतदानाच्या दिवशी विशेष सुविधा पुरविणार – जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांची माहिती

मुंबई उपनगर, दि. 22 : मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठीची अधिसूचना 26 एप्रिल रोजी जारी होणार आहे. या निवडणुकीसाठी जिल्हा निवडणूक यंत्रणेची तयारी पूर्ण झाली असून आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. मतदानाची टक्केवारी ही राष्ट्रीय व राज्य सरासरीपेक्षा जास्त असावी, यासाठी विशेष प्रयत्न केले जात असून जिल्ह्यातील मतदारांनी त्यांना दिलेला मतदानाचा … Read more

‘दिलखुलास’मध्ये वर्धा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची ‘लोकसभा निवडणुकांची तयारी’ यावर गुरुवारी मुलाखत

मुंबई, दि. २२ : ‘लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ साठी वर्धा जिल्हा प्रशासन सज्ज’ याविषयी  जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल कर्डिले यांची मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात गुरुवार २५ एप्रिल २०२४  रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल अॅपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. वर्धा जिल्ह्याच्या प्रभारी जिल्हा … Read more

शेकडोंच्या समुदायाने केला मतदानाचा संकल्प; नांदेडच्या परेड मैदानात रंगारंग कार्यक्रमाची मेजवानी 

नांदेड दि. २२ एप्रिल : 26 एप्रिल रोजी नांदेड येथे होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये मतदारांनी मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडावे, यासाठी जिल्हा प्रशासनाने आज विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेला साद घातली आहे. प्रत्येक कर्मचाऱ्यांने किमान 50 मतदारांना मतदानासाठी प्रेरित करण्याचा संकल्प आज शेकोडोंच्या संख्येने, उपस्थित कर्मचाऱ्यांनी नांदेड पोलीस परेड ग्राउंडवर केला. सोमवारची सकाळ पोलीस परेड ग्राउंडवर नांदेड … Read more

आता जळगाव जिल्ह्यात प्रत्येक आठवडी बाजारात ‘मतदार सुविधा केंद्र’; ८ मे पर्यंत सुविधा उपलब्ध

jalgaon1 1 1024x768 ELj9NT आता जळगाव जिल्ह्यात प्रत्येक आठवडी बाजारात ‘मतदार सुविधा केंद्र’; ८ मे पर्यंत सुविधा उपलब्ध

जळगाव, दि. 22 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने जिल्ह्यात आठवडे बाजार असलेल्या प्रत्येक गावी ‘मतदार सुविधा केंद्र’ स्थापन केले जाणार आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांच्या सूचनेनुसार बाजाराच्या दिवशी हे मतदार सुविधा केंद्र उभारून मतदारांना मतदान विषयक सर्व माहिती द्यायची आहे. मतदानापूर्वी आपले नाव मतदार यादीत कसे बघायचे, स्लिप कशी काढायची, पुराव्यासाठी … Read more

सुलभ आणि शांततापूर्ण मतदानासाठी आवश्यक प्रयत्न करा – मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम

Pne Photo Nivadnuk Adhaava baithak dt21 April.24.jpg 2 kDnV3M सुलभ आणि शांततापूर्ण मतदानासाठी आवश्यक प्रयत्न करा – मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम

पुणे, दि. २१ : जिल्ह्यातील चारही मतदारसंघात मतदानाचे प्रमाण वाढावे आणि मतदारांना सुलभपणे तसेच शांततापूर्ण वातावरणात मतदान करता यावे यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावे; त्यादृष्टीने मतदान केंद्रावर आवश्यक सुविधा करण्यासोबत त्याची माहिती मतदारांना द्यावी, असे निर्देश राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित निवडणूक विषयक आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी … Read more

गडचिरोलीत लोकशाहीचा विजय

गडचिरोली… दुर्गम, वनाने वेढलेला, आदिवासी आणि मागास अशी ओळख असलेला जिल्हा. खरे तर विपुल वनसंपदा, खनिजसंपत्ती, नद्यांचा प्रदेश आणि आदिवासी संस्कृतीचे जतन करणारा यासोबतच लोकशाहीवर विश्वास ठेवणारा अशी या जिल्ह्याची ओळख असायला हवी. येथे 19 एप्रिल रोजी झालेल्या लोकसभा-2024 च्या निवडणुकीत राज्यात सर्वाधिक म्हणजे सुमारे 72 टक्के मतदारांनी लोकशाही मूल्यांप्रती बांधिलकी दर्शवित मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य … Read more

७५ टक्क्‍यापेक्षा जास्‍त मतदान टक्केवारी साध्‍य करणाऱ्या केंद्राचा होणार सन्‍मान

नांदेड, दि. 21  एप्रिल :- लोकसभा निवडणुकीच्‍या अनुषंगाने नांदेड जिल्‍ह्यात स्‍वीप अंतर्गत मतदार जागृतीचे विविध उपक्रम सुरु आहेत. या उपक्रमाच्‍या अनुषंगाने सर्वोकृष्‍ट कामगिरी व उत्‍कृष्‍ट मतदान टक्‍केवारी करणा-या  गावांचा, वार्डचा त्‍याचप्रमाणे मतदानासाठी नियुक्‍त सर्वस्‍तरीय अधिकारी व कर्मचारी यांचा सन्मान करण्‍यात येणार आहे. नांदेड जिल्‍ह्यात प्रत्‍येक विधानसभा मतदार संघातील सर्वोकृष्‍ट मतदान टक्‍केवारी असलेल्‍या तीन मतदान केंद्राचा … Read more

तिसऱ्या टप्प्यातील निवडणूक उमेदवारी अर्जांच्या छाननीनंतर ३१७ अर्ज वैध             

मुंबई, दि. 21 : राज्यातील लोकसभा निवडणूक २०२४ च्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान ७ मे २०२४ रोजी होणार आहे. यासाठी राज्यातील ११ मतदारसंघात ३६१ उमेदवारांचे ५२२ अर्ज दाखल झाले होते. अर्जांची छाननी केल्यानंतर एकूण ३१७ उमेदवारांचे अर्ज वैध असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे. तिसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर रायगड लोकसभा मतदार संघात २१,  बारामती-४६, … Read more

सावधान….भारतीय लोकशाहीत पेड न्यूजला थारा नाही…!

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची रणधुमाळी सुरू झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतीय निवडणूक आयोगाने दि.16 मार्च 2024 “आदर्श आचार संहिता” जाहीर केली आहे. लोकसभेत योग्य, कार्यक्षम व लोकाभिमुख दृष्टिकोन असलेला लोकप्रतिनिधी निवडून देण्यासाठी प्रत्येक भारतीय  मतदाराने मतदान करावे, असे आवाहन प्रशासनाकडून वारंवार करण्यात येते. मतदान करणे, हे राष्ट्रीय कर्तव्य असल्याने मतदारांनी कुठल्याही आमिषाला वा प्रलोभनाला … Read more

अग्निशमन सेवा सप्ताहाची सांगता

72a52de3 b2b8 48cc 8ce3 d909607a1147 5bjHpS अग्निशमन सेवा सप्ताहाची सांगता

मुंबई, दि. २० :  अग्निशमन सेवा सप्ताहाचा सांगता समारोह मुंबई विद्यापीठाच्या कालिना येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन समोरील मैदानावर २० एप्रिल रोजी पार पडला. १४ एप्रिल १९४४ रोजी मुंबई गोदीत एस. एस. फोर्ट स्टिकिन् या जहाजाला आग लागून झालेल्या भीषण स्फोटात अग्निशमन व विमोचनाचे कार्य करीत असताना मुंबई अग्निशमन दलाच्या ६६ जवानांना हौतात्म्य प्राप्त झाले. या … Read more

अजूनही मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याची संधी…

मुंबई, दि. २० : निवडणूक काळात प्रत्येक टप्प्यावर नामांकनाच्या अखेरच्या दिवसाच्या साधारण १० दिवस आधीपर्यंत मतदार नोंदणीसाठी आलेले अर्ज हे मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याच्या दृष्टीने विचारात घेतले जातात. या अर्जांची आणि पुरावा म्हणून जोडलेल्या दस्तऐवजांची पडताळणी करण्यासाठी व हरकती मागवण्यासाठी हा साधारण १० दिवसांचा कालावधी गृहीत धरला गेला आहे. राज्यात पाचव्या टप्प्यात  दि. २० मे … Read more

… संधी अजूनही आहे !

महाराष्ट्र राज्यात पाचव्या टप्प्यातले मतदान दि.20 मे, 2024 रोजी पार पडणार आहे. निवडणूक प्रक्रियेचा केंद्रबिंदू म्हणजे मतदार. मतदान करण्यासाठी पात्र असलेला आणि मतदानाची इच्छा असलेला कोणीही मतदार मतदानापासून वंचित राहू नये. हयासाठीची  सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मतदार यादीत नाव असायला पाहिजे. आपण राहतो तिथल्या मतदार यादीत आपले नाव आहे की नाही, हे तपासण्यासाठी उत्तम सुविधा … Read more