तिसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ३६१ उमेदवारांचे ५२२ अर्ज दाखल

मुंबई, दि. १९ : राज्यातील लोकसभा निवडणुक २०२४ च्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान ७ मे २०२४ रोजी होणार आहे. यासाठी राज्यातील ११ मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. आज सायंकाळपर्यंत एकूण ३६१ उमेदवारांचे ५२२ अर्ज दाखल झाले असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे. तिसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या … Read more

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील पाच मतदारसंघातील मतदान शांततेत; सायंकाळी ६ वाजेपर्यंत अंदाजे ६०.२२ टक्के मतदान

              मुंबई, दि. 19 : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील पाच मतदार संघांमध्ये आज दि.19 एप्रिल 2024 रोजी शांततेत मतदान पार पडले असून पहिल्या टप्प्यातील एकूण पाच मतदार संघात सायंकाळी 6 वाजेपर्यंत अंदाजे सरासरी 60.22 टक्के मतदान झाले असल्याची माहिती  मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली.             पहिल्या टप्प्यातील एकूण ५ लोकसभा मतदारसंघनिहाय  मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे : ९-रामटेक ५८.५० टक्के, १०-नागपूर ५३.७१ टक्के, ११-भंडारा- गोंदिया ६४.०८ टक्के, १२-गडचिरोली- चिमूर … Read more

निवडणूक जप्ती व्यवस्थापन प्रणाली विकसित

मुंबई, दि. १९ : लोकसभा निवडणुका निर्भिड व निःपक्षपातीपणे पार पाडण्याची जबाबदारी भारत निवडणूक आयोगाची आहे. निवडणुका निःपक्षपातीपणे पार पाडण्याच्या मार्गातील महत्त्वाचा अडथळा म्हणजे काही समाज घटकांकडून मतदारांना देण्यात येणारी विविध आमिषे (उदा. पैसा, मौल्यवान वस्तू, दारु इ.) आहेत. या आमिषांवर प्रतिबंध घालण्यासाठी भारत निवडणूक आयोगाद्वारे विविध उपाययोजना आखल्या असून त्याचाच एक भाग म्हणून भारत … Read more

आंतरराज्यीय अमली पदार्थाच्या रॅकेटचा पर्दाफाश

मुंबई, दि. १९ : केंद्रीय गृहविभागाच्या अंतर्गत सुरक्षा विभागाच्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या मुंबई पथकाने केलेल्या कारवाईत महाराष्ट्रातून कार्यरत आंतरराज्यीय अमली पदार्थाचे रॅकेट उघड झाले असून त्यांच्यावर एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच यामध्ये एकूण चार जणांना अटक करण्यात आली आहे. तर अंदाजित १३५ कोटी रकमेचे १९९.२९ किलो अल्प्राझोलम तसेच एक वाहन आणि दोन … Read more

मुंबई शहर व उपनगर जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेसंदर्भात आढावा बैठक

मुंबई, दि. १९ : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात सह्याद्री अतिथीगृह येथे आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आदर्श आचारसंहिता व कायदा सुव्यवस्थेबाबत आवश्यक त्या उपाययोजना करून दक्षता घेण्याचे निर्देश मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव, मुंबई उपनगर जिल्ह्याचे … Read more

आला उन्हाळा, तब्येत सांभाळा

सध्या सर्वत्र तापमान वाढत असून, उष्णतेच्या लाटेकडे दुर्लक्ष करू नये. सामान्य मानवी शरीराचे तापमान 36.4°C ते 37.2°C (97.5°F ते 98.9°F) दरम्यान असते. उष्माघाताचे गंभीर परिणाम होतात. ते टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी आणि सुरक्षित राहावे. उष्णता, अति उष्णता, उष्माघाताची लाट यापासून बचाव करण्यासाठीच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आलेल्या सूचनांची माहिती या लेखात देण्यात आली … Read more

सांगली जिल्ह्यात २४ लाखांहून अधिक मतदार बजावणार मतदानाचा हक्क

सांगली, दि. १९ (जिमाका) :  जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी येत्या 7  मे 2024 रोजी मतदान होत असून  जिल्ह्यात लोकसभेसाठी 24 लाख 36 हजार 820 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये  12 लाख  43 हजार 397 इतके पुरुष मतदार, 11 लाख 93 हजार 291 स्त्री मतदार आणि 132 इतक्या तृतीपंथी मतदारांचा समावेश आहे, अशी माहिती  जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिली. मिरज विधानसभा मतदारसंघात 1 लाख 65 हजार 208 पुरूष व 1 लाख 61 हजार 83 स्त्री  आणि 25 तृतीयपंथी मतदार, सांगली विधानसभा मतदारसंघात 1 लाख 70 हजार 542 पुरूष व 1 लाख 67 हजार 889 स्त्री आणि 66 तृतीयपंथी मतदार, पलुस-कडेगांव विधानसभा मतदारसंघात 1 लाख 43 हजार 49 पुरूष व 1 लाख 41 हजार 518 स्त्री आणि 8 तृतीयपंथी मतदार, खानापूर विधानसभा मतदारसंघात 1 लाख 71 हजार 333 पुरूष … Read more

विभाग प्रमुखांच्‍या गाड्यावर आता मतदान जनजागृती

WhatsApp Image 2024 04 19 at 4.23.56 PM 3 WmDE00 विभाग प्रमुखांच्‍या गाड्यावर आता मतदान जनजागृती

नांदेड दि. १९ :  मतदानाविषयी जनजागृती करण्‍यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने विविध उप‍क्रम राबविण्‍यात येत आहेत. जिल्हा परिषदेच्या प्रांगणात आज मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या हस्ते सकाळी 11 वाजता मतदान करण्‍याबाबत आवाहन असलेले स्टिकर्स विविध विभाग प्रमुखांच्‍या वाहनांवर लावण्यात आले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय … Read more

अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांची’दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मुलाखत

मुंबई, दि. १९ : ‘लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ साठी लागू असलेली ‘आदर्श आचारसंहिता’ याविषयी  अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांची  ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मुलाखत   प्रसारित होणार आहे. ज्येष्ठ वृत्त निवेदक शिबानी जोशी यांनी ही मुलाखत घेतली आहे. आदर्श आचारसंहिता म्हणजे काय ? या कालावधीत काय करावे आणि काय करू नये, समाज माध्यमांसाठी … Read more

‘कर सहायक’ मुख्य परीक्षेसह टंकलेखन कौशल्य चाचणी निकाल नियमानुसार

मुंबई, दि. १९ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त परीक्षा – 2023 मधील पूर्व परीक्षेसाठीच्या आवेदनापत्रात ‘कर सहायक’ संवर्गाचा विकल्प दिलेल्या उमेदवारांनाच मुख्य परीक्षेसाठी आणि टंकलेखन कौशल्य चाचणीकरिता गुणवत्तेवर पात्र ठरविण्यात आले असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त (मुख्य) परीक्षा – 2023 या परीक्षेचा निकाल आयोगाकडून दिनांक 16 एप्रिल, 2024 … Read more

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील पाच मतदारसंघात दुपारी ५ वाजेपर्यंत ५४.८५ टक्के मतदान

election 5 pm percentage 819x1024 लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील पाच मतदारसंघात दुपारी ५ वाजेपर्यंत ५४.८५ टक्के मतदान

मुंबई, दि.१९ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज दि. १९ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७.००वा.पासून सूरु झाले आहे. पहिल्या टप्प्यातील एकूण पाच मतदार संघात सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत सरासरी ५४.८५  टक्के मतदान झाले आहे. पहिल्या टप्प्यातील एकूण ५ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे – रामटेक  ५२.३८ टक्के नागपूर ४७.९१ टक्के भंडारा- गोंदिया ५६.८७ टक्के गडचिरोली- चिमूर … Read more

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील पाच मतदारसंघात दुपारी ३ वाजेपर्यंत ४४.१२ टक्के मतदान

मुंबई, दि.१९ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज दि.१९ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७.०० वा.पासून सूरु झाले आहे. पहिल्या टप्प्यातील एकूण पाच मतदार संघात दुपारी ३.०० वाजेपर्यंत ४४.१२ टक्के मतदान झाले आहे.   पहिल्या टप्प्यातील एकूण ५ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे रामटेक  ४०.१० टक्के नागपूर ३८.४३ टक्के भंडारा- गोंदिया ४५.८८ टक्के गडचिरोली- चिमूर … Read more

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील पाच मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत ३२.३६ टक्के मतदान              

GLg6bd6XwAA6L k लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील पाच मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत ३२.३६ टक्के मतदान              

मुंबई, दि. १९ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज दि.१९ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७.०० वा.पासून सुरु झाले आहे. पहिल्या टप्प्यातील एकूण पाच मतदार संघात दुपारी १.०० वाजेपर्यंत  ३२.३६ टक्के मतदान झाले आहे. पहिल्या टप्प्यातील एकूण ५ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे :- रामटेक  २८. ७३ टक्के नागपूर २८. ७५ टक्के भंडारा- गोंदिया ३४ .५६ … Read more

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील पाच मतदारसंघात सकाळी ११ वाजेपर्यंत १९.१७ टक्के मतदान

GLgdFDFXgAA2Upw v2O92h लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील पाच मतदारसंघात सकाळी ११ वाजेपर्यंत १९.१७ टक्के मतदान

मुंबई, दि.१९ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज दि.१९ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७.००वा.पासून सूरु झाले आहे. पहिल्या टप्प्यातील एकूण पाच मतदार संघात सकाळी ११.०० वाजेपर्यंत १९.१७ टक्के मतदान झाले आहे. पहिल्या टप्प्यातील एकूण ५ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे रामटेक १६.१४ टक्के नागपूर १७.५३ टक्के भंडारा- गोंदिया १९.७२ टक्के गडचिरोली- चिमूर २४.८८ टक्के … Read more

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील पाच मतदारसंघात दोन तासात ७.२८ टक्के मतदान

मुंबई, दि.१९ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज दि.१९ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७.००वा.पासून सूरु झाले आहे. पहिल्या टप्प्यातील एकूण पाच मतदार संघात पहिल्या दोन तासात म्हणजे सकाळी ७.०० ते ९.०० वाजेपर्यंत ७.२८ टक्के मतदान झाले आहे. पहिल्या टप्प्यातील एकूण ५ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे रामटेक ५.८२ टक्के नागपूर ७.७३ टक्के भंडारा- गोंदिया … Read more