Auto Award 2022 | बजाजच्या ‘या’ बाईकला मिळाला बाईक ऑफ द इयर पुरस्कार

Auto Award 2022 | टीम महाराष्ट्र देशा: देशातील आघाडीची ऑटोमोबाईल उत्पादक कंपनी बजाज (Bajaj) नेहमी आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन फीचर्ससह बाईक लाँच करत असते. अशा परिस्थितीमध्ये 2022 चा बाईक ऑफ द इयर पुरस्कार बजाजच्या Bajaj Pulsar N160 ला देण्यात आला आहे. Bajaj Pulsar N160 या बाईकने यावर्षी बाजारामध्ये खळबळ उडवली होती. म्हणून यावर्षीचा बाईक ऑफ द इयर पुरस्कार या गाडीला देण्यात आला आहे. बजाजची Bajaj Pulsar N160 ही Pulsar N250 ची स्ट्रिप डाऊन आवृत्ती आहे. या बाईचा लुक खूप अग्रेसिव दिसतो. या बाईचे डिझाईन स्पोर्टी लुकमध्ये करण्यात आलेले आहे.

इंजिन

Bajaj Pulsar N160 या बाईच्या इंजिन बद्दल बोलायचे झाले, तर यामध्ये 164cc सिंगल सिलेंडर इंजिन उपलब्ध आहे. इंजिन रेव्ह रेंजमध्ये 85% पीक टार्क निर्माण करू शकते. या गाडीमध्ये 5-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आलेला आहे. ही बाईक दैनंदिन वापरासाठी खूप आरामदायी ठरू शकते.

फीचर्स

Bajaj Pulsar N160 या बाईकमध्ये बाय फंक्शनल एलईडी प्रोजेक्टर हेडलाईन उपलब्ध आहे. ही मोटरसायकल किती अंतर कापू शकते याची कल्पना देण्यासाठी बाईकमध्ये रियलआउट डिस्टेंस फीचर देण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर या बाईकमध्ये यूएसबी फोन चार्जिंग पोर्ट देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे.

Bajaj Pulsar N160 ही बाईक दिसायला खूप अग्रेसिव आहे. त्याचबरोबर या बाईकमध्ये अनेक उत्कृष्ट वैशिष्ट्य उपलब्ध आहे. त्याचबरोबर या बाईकमध्ये 160cc इंजिन उपलब्ध आहे. ही बाईक दररोजच्या वापरासाठी एक सर्वोत्तम बाईक आहे. या सर्व खास गोष्टींमुळे बजाजची ही बाईक बाईक ऑफ द इयर ठरली आहे.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed.