Avatar: The Way of Water | ‘अवतार:द वे ऑफ वॉटर’चा भारतात धुमाकूळ, रिलीजपूर्वी झाली हजारो टिकिटांची बुकिंग

टीम महाराष्ट्र देशा: प्रसिद्ध चित्रपट निर्माते जेम्स कॅमेरॉन (James Cameron) यांच्या ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ (Avatar: The Way of Water) या चित्रपटाच्या प्रदर्शनाची चाहते आतुरतेने वाट बघत आहे. 2009 मध्ये रिलीज झालेल्या ‘अवतार’ या चित्रपटाचा हा सिक्वेल आहे. 2009 साली रिलीज झालेल्या ‘अवतार’ चित्रपटाची क्रेझ अजूनही लोकांच्या डोक्यात आहे. काही दिवसांपूर्वी ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला होता. या चित्रपटाचे ट्रेलरला चाहत्यांकडून उदंड प्रतिसाद मिळाला होता. त्याचबरोबर ट्रेलर रिलीजनंतर चाहत्यांना चित्रपटाची उत्सुकता अधिक लागली आहे. अशा परिस्थितीमध्ये भारतात हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच टिकीट बुकिंग सुरू झाली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, फक्त तीन दिवसांमध्ये ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ या चित्रपटाच्या रिलीजपूर्वीच 15 हजाराहून अधिक टिकिटांची विक्री झाली आहे. ही आडवांस बुकिंग फक्त 45 स्क्रीनवर प्रीमियर स्वरूपात उपलब्ध होते. दरम्यान, चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगला मिळत असलेला प्रतिसाद पाहता, या चित्रपटासाठी आणखीन स्क्रीन वाढवण्यात येणार आहे.

या भाषांमध्ये प्रदर्शित होणार ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ (Avatar: The Way of Water)

‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ हा चित्रपट 16 डिसेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. हा चित्रपट इंग्रजी व्यतिरिक्त हिंदी, तमिल, तेलगू, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये देशभरात प्रदर्शित होणार आहे. चित्रपट निर्माते जेम्स यांनी ‘अवतार’ पुन्हा एकदा चाहत्यांसाठी प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. तर ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ या चित्रपटामध्ये मानव आणि पेंडोरा येथील रहिवासांमध्ये पाण्याखाली लढाई होणार आहे, हे या चित्रपटाच्या ट्रेलर मधून स्पष्ट झाले आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ हा चित्रपट 250 दशलक्ष डॉलरमध्ये तयार करण्यात आलेला आहे. अशा परिस्थितीत या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करावी लागणार आहे. ‘अवतार’ या चित्रपटाच्या पहिल्या भागाने जगभरात $2.9 अब्ज रुपयांची कमाई केली होती.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.