Ayodhya verdict: ‘या’ गोष्टी टाळाच, अन्यथा होणार कायदेशीर कारवाई

अवघ्या देशभराचे लक्ष लागलेल्या अयोध्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिला आहे. वादग्रस्त जागा ही रामल्ल्लाला म्हणजे हिंदूना बहाल करण्यात आली आहे. यामुळे अयोध्येत राम मंदिर बनवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अयोध्या प्रकरणाच्या निकालावर आज (9 नोव्हेंबर) सकाळी 11.15 च्या सुमारास अंतिम निर्णय दिला गेला.

“अयोध्येत राम मंदिर निर्माणासाठी नियम बनवा” असे आदेश सर्वाच्च न्यायलयाने केंद्राला दिले आहे. “एखादी ट्रस्ट स्थापन करुन राम मंदिर उभारा” असेही नमूद केले आहे. तसेच मुस्लिमांना अयोध्येत वेगळी 5 एकर जमीन मिळणार आहे. निकालानंतर काही गोष्टी टाळण्याचे आदेश दिले गेले आहेत ते खालीलप्रमाणे

निकालानंतर या गोष्टी टाळाच, अन्यथा होणार कायदेशीर कारवाई

Loading...

जमाव करुन थांबू नका, भाषणबाजी करु नका.

अयोध्या प्रकरणाच्या निकालानंतर कोणत्याही धर्माच्या भावना दुखावतील असे मेसेज सोशल मीडियावर फॉरवर्ड करु नका.

महाआरती किंवा समूह पठण यांचं आयोजन करु नये.

निकालानिमित्त पेढे, मिठाई वाटू नये.

कोणतंही वाद्य वाजवू नये.

कोणत्याही प्रकारची जातीय दंगल होईल, असे जुने व्हिडीओ, फोटो पुन्हा पोस्ट करू नये

अफवा पसरवू नये.

निकालानंतर घोषणाबाजी करुन जल्लोष करु नये

गुलाल उधळू नये

फटाके वाजवू नयेत.

मिरवणूक, रॅली काढू नये किंवा बाईल रॅली काढू नये.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.