“बाबा जे जे काही बोलतात ते नेहमीच करून दाखवतात”

निवडणुकीचा निकाल लागल्याच्या दिवसापासून संजय राऊतांनी पत्रकार परिषदेचा धडाका लावला होता. दरदिवशी पत्रकार परिषद घेऊन ते भाजपावर निशाणा साधत होते, तर दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शरद पवारांवर स्तुतिसुमनं उधळत होते. त्यावेळीच महाशिवआघाडीचं सरकार राज्यात येणार असल्याची अटकळ बांधली जात होती.

गेल्या काही दिवसांपूर्वीच संजय राऊत यांच्यावर अॅजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया झाली असून, राऊत आता पुन्हा राजकीय भूमिका मांडत आहेत. संजय राऊतांचं कुटुंबसुद्धा त्यांच्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी दिल्लीत दाखल झालं असून, राज्यातल्या सत्ता स्थापनेसंदर्भात त्यांच्या पुत्रीनं मतप्रदर्शन केलं आहे. बाबांनी एकदा ठरवलं म्हणजे ठरवलं, मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, असं मत विधिता राऊत यांनी व्यक्त केलं आहे. पुढे ती म्हणते, “बाबा जे जे काही बोलतात ते नेहमीच करून दाखवतात. आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी उभे आहोत. मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार हे त्यांनी सांगितलंय, म्हणजे तसंच होणार असल्याचं एका वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेत विधितानं म्हटलं आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.