Baba Ramdev | “अमृता फडणवीस १०० वर्षे म्हाताऱ्या होणार नाहीत, कारण…”; रामदेव बाबांचं वक्तव्य चर्चेत!
Baba Ramdev | मुंबई : ठाण्यातील हायलँड मैदानात योग गुरु रामदेव बाबा यांनी योगासन करत योगाचे धडे दिले .यावेळी मोठ्या संख्येने ठाणेकर नागरिकांनी योगासनाचा लाभ घेतला. यावेळी बोलताना बाबा रामदेव (Baba Ramdev) यांनी अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
बाबा रामदेव म्हणाले, “अमृता फडणवीस पुरेसे अन्न खातात. पुढील शंभर वर्ष ते म्हाताऱ्या होणार नाहीत. कारण, त्या नेहमी आनंदी राहतात. जसा आनंद अमृता फडणवीस यांच्या चेहऱ्यावर आहे, तसाच तुमच्या चेहऱ्यावर पाहायचा आहे,” असे बाबा रामदेव यांनी म्हंटल आहे.
याच कार्यक्रमात रामदेव बाबा यांनी आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केलं. योगा कार्यक्रमात महिलांनी योगासाठी ड्रेस आणले होते आणि त्यानंतर महिलांसाठी महासंमेलानाचे आयोजन करण्यात आले होते. या महासंमेलनासाठी महिलांनी साड्या आणल्या होत्या. मात्र दोन्ही कार्यक्रम सलग असल्याने महिलांना साड्या नेसायला वेळच मिळाला नाही.
याबाबत बाबा रामदेव यांनी म्हटलं की साड्या नेसायला वेळ नाही मिळाला, तरी काही अडचण नाही. आता घरी जाऊन साड्या नेसा. पुढे रामदेव बाबा म्हणाले की, “महिला साड्या नेसून पण चांगल्या वाटतात, महिला सलवार सूटमध्ये सुद्धा चांगल्या वाटतात, आणि माझ्या नजरेने तर काही नाही घातलं तरी त्या चांगल्या दिसतात.”
महत्वाच्या बातम्या :
- Eknath Shinde | “आम्ही उघडपणे दर्शनाला जातो, काही लोकं…”; मुख्यमंत्र्यांचा संजय राऊतांना खोचक टोला
- Yashomati Thakur | बाबा रामदेव यांच्या विधानावर यशोमती ठाकूर म्हणाल्या, “भगवा परिधान करून खालच्या दर्जाच वक्तव्य…”
- Amol Mitkari | “तुका म्हणे तोचि वेडा, त्याचे हाणूनी थोबाड फोडा”; रामदेव बाबांच्या विधानावर अमोल मिटकरी आक्रमक
- Skin Care Tips | पार्लरमध्ये न जाता ग्लोइंग स्किन हवी असेल तर, करा ‘या’ आयुर्वेदिक पद्धती फॉलो
- Health Tips | ब्रश न करता पाणी पिणे आहे आरोग्यासाठी फायदेशीर, जाणून घ्या!
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.