23 मे रोजी एनडीएला बहुमत मिळणार, मोदी पुन्हा पंतप्रधान होणार – रामदेव बाबा

लोकसभा निवडणुकीत एनडीएला पुर्ण बहुमत मिळेल, तसेच नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान बनतील, असा विश्वास योगगुरू रामदेव बाबा यांनी व्यक्त केला आहे.

माझ्या भविष्यवाणीनं 23 मे रोजी देशातील काही राजकारण्यांचं स्वास्थ बिगडेल. त्यांना टेन्शन येईल. शिवाय, त्यांचं मानसिक स्वास्थ बिघडेल असं देखील बाबा रामदेव यांनी म्हटलं आहे. ते हरिद्वार येथील एका कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी त्यांनी पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचारावरही भाष्य केले. पश्चिम बंगालमध्ये रोड शो दरम्यान झालेली हिंसा म्हणजे लोकशाहीचा अपमान असल्याचं बाबा रामदेव यांनी म्हटलं आहे. राजकारणात हिंसेला कोणतंही स्थान नाही. ममता बॅनर्जी घाबरली आहे. अशा शब्दात बाबा रामदेव यांनी ममता बॅनर्जींवर टीकास्त्र टाकलं.

Loading...

महत्त्वाच्या बातम्या –

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.