बाबा रामदेवचा घुमजाव; कोरोनावरील लस घेणार असल्याचं केलं स्पष्ट

नवी दिल्ली : अ‍ॅलोपॅथी औषधं आणि डॉक्टरांवर टीका केल्यानंतर बाबा रामदेव यांनी घुमजाव केलं आहे. कोरोनावरील लस घेणार असल्याचं योगगुरू रामदेव यांनी जाहीर केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ जूनपासून देशातील १८ वर्षांवरील सर्वांचं मोफत लसीकरण केलं जाईल अशी घोषणा केली आहे. बाबा रामदेव यांनी लस घेण्याचं आवाहन केल्यानं सर्वांचा भुवया उंचावल्या आहेत.

“आमचं संघटनेसोबत कोणतही शत्रूत्व नाही. सर्व चांगले डॉक्टर देवाने पृथ्वीवर पाठवलेले देवदूत आहेत. आमची लढाई डॉक्टरांसोबत नाही. जे डॉक्टर आमचा विरोध करताहेत. ते कोणत्याही संस्थेद्वारे करत नाही”, असं त्यांनी यावेळी सांगितलं.

“औषधांच्या नावाखाली कुणाला त्रास देऊ नका. लोकांनी अनावश्यक औषधांपासून स्वत:चा बचाव केला पाहीजे. अ‍ॅलोपॅथी आपतकालीन आजारांमध्ये आणि सर्जरीसाठी चांगली आहे. पंतप्रधानांना जनऔषधी दुकानं सुरु करावी लागली. कारण औषध माफियांकडून फॅन्सी दुकानं थाटली गेली आहेत. तिथे अनावश्यक औषधं जास्त किंमतींना विकली जात आहेत”, असंही त्यांनी पुढे सांगितलं.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा