‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ मालिकेच्या सेटवर रंगला क्रिकेटचा सामना

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या मालिकेतून बाबासाहेबांच्या आयुष्यातील सुख- दु:खाचे प्रसंग जवळून अनुभवण्याची संधी प्रेक्षकांना मिळते आहे. बाबासाहेबांची ाची आवड ते मिळवण्यासाठीची तळमळ आपण मालिकेत पहातच आहोत. शिक्षणसोबतच खेळणं हा बाबासाहेबांचा आवडता छंद. मालिकेच्या काही भागांमध्ये प्रेक्षकांनी ते अनुभवलंय पण छोट्या भीवाच्या रुपात. लहानग्या मंडळींना एकत्र करुन चिमुकला भीवा तासनतास क्रिकेटच्या खेळात रमे. परदेशातून उच्च घेऊन परतल्यानंतर बाबासाहेबांना बालपणीच्या दिवसांची पुन्हा एकदा आठवण झाली आणि त्यांनी बॅट हातात घेतली. नुकताच हा प्रसंग चित्रित करण्यात आला.

मालिकेत क्रिकेट खेळतानाचा हा प्रसंग चित्रित होत असताना खरोखरचा क्रिकेटचा सामना खेळण्यात आला. बाबासाहेबांची भूमिका साकारणाऱ्या सागर देशमुखलाही क्रिकेटची खुप आवड आहे. शूटिंगच्या निमित्ताने आवडही जपता येत असल्याचा आनंद सागरने व्यक्त केला. या अनोख्या अनुभवाविषयी सांगताना सागर म्हणतो, मी कटारिया हायस्कूल पुणे ह्या शाळेचा विद्यार्थी. आमच्या शाळेत क्रिकेटची टीम खूप तगडी होती आणि लहानपणापासून मला क्रिकेट खेळायला खूप आवडायचं. शाळेच्या टीमकडून कधी फारशी संधी मिळाली नाही खेळायला पण मग महाराणा प्रताप संघ, इंगळेज क्रिकेट क्लब ह्या संघांकडून मी खेळलो. पुण्याच्या मराठवाडा मित्रमंडळ ह्या कॉलेजमध्ये मी ११वी आणि १२वी केली तेव्हाही त्या संघाकडून खेळलो. पुण्याच्या एस पी कॉलेज, फर्ग्युसन कॉलेज, आय एल् एस लॉ कॉलेज ह्या महाविद्यालयांच्या मैदानावर न जाणो कित्येक सामने मी खेळलो आहे.

आज मालिकेत जेव्हा बाबासाहेब क्रिकेट खेळत असतानाचा प्रसंग आम्ही शूट करत होतो तेव्हा खरोखरचा सामना रंगला. बाबासाहेबांच्या नावाचा जयघोष , टाळ्या, धावा काढणे असे जोशपूर्ण वातावरण सेटवर होते. सीन शूट झाल्यावर पुन्हा एकदा ह्या थोर महामानवाच्या कलागुणांचा विचार करून थक्क व्हायला झाले.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.