InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

येत्या 30 जुलैपर्यंत मराठवाड्यात कृत्रिम पाऊस पाडणार : बबनराव लोणीकर

- Advertisement -

पावसाने ओढ दिलेल्या मराठवाड्यात कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी राज्य सरकारने तयारी केली आहे. येत्या 30 जुलैपर्यंत मराठवाड्यात कृत्रिम पाऊस पाडला जाईल, अशी माहिती राज्याचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली आहे.मराठावाड्यात कमी पावसामुळे नागरिकांची चिंता वाढली आहेत. त्यामुळे कृत्रिम पाऊस पाडण्याच्या दृष्टीने राज्य मंत्रिमंडळात चर्चा झाली आहे.

राज्य सरकारने कृत्रिम पाऊस पाडण्याच्या दृष्टीने लागणाऱ्या परवानग्यांसाठी केंद्र सरकारकडे अर्ज केले आहेत, त्या परवानग्या लवकरच मिळणार आहेत. कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी लागणाऱ्या विमानाला औरंगाबाद विमानतळावरुन उड्डाणाची परवानगी घ्यावी लागणार आहे. तसेच कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी लागणारी रडार यंत्रणेचीही परवानगी घ्यावी लागणार आहे, अशी माहिती बबनराव लोणीकर यांनी दिली.

Loading...

- Advertisement -

साधारण 30 जुलैपर्यंत कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी लागणाऱ्या सर्व यंत्रणांच्या परवानग्या राज्य सरकारला मिळतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 30 कोटी रुपयांचा निधी कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी उपलब्ध करुन दिला आहे. त्यामुळे लवकरच मराठवाड्यात कृत्रिम पाऊस पाडला जाईल, असं बबनराव लोणीकर यांनी सांगितलं.

Loading...

 

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.