‘तारक मेहता’मधून गायब होण्याच्या चर्चांवर बबिताने सोडलं मौन, म्हणाली शोच्या मेकर्सने मला…

मुंबई : ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ फेम बबिता म्हणजेच अभिनेत्री मुनमुन दत्ता काही दिवसांपासून शोमध्ये दिसत नसल्यामुळे बबीताजीने ही मालिका सोडली असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होत्या. त्यावर आता बबीताने पुढे येत स्पष्टीकरण दिलंय.

यावेळी बोलताना मुनमुन दत्ता म्हणाली, “सध्या या शोमध्ये माझी गरज नाही. गेल्या दोन तीन दिवसांपासून मी मालिका सोडल्याबाबतच्या अफवा पसरत आहेत. याचा माझ्या जीवनावर नकारात्मक प्रभाव पडतोय. मी सेटवर हजेरी लावत नाही, हे खरं नाही. सध्या या शोमध्ये माझ्या उपस्थितीची गरज नाही. त्यामूळे मी सेटवर येत नाही.” असं मूनमुन म्हणाली.

दरम्यान गेल्या महिन्यात अभिनेत्री मुनमुन दत्ताने एका व्हिडीओत जातीवाचक शब्द वापरल्यामुळे ती वादात अडकली होती. या प्रकरणात तिच्याविरोधात पोलिसांत तक्रारही दाखल करण्यात आली होती. या प्रकरणामुळे मालिकेला कोणताही नुकसान होऊ नये म्हणून शोच्या मेकर्सनी अभिनेत्री मुनमुन दत्तासाठी कोणतीही स्किप्ट न लिहिण्याचा निर्णय घेतलाय. तसंच या प्रकरणातून धडा घेत मेकर्सनी आता या मालिकेत काम करणाऱ्या कलाकारांकडून अंडरटेकिंग साईन करुन घेण्याचा निर्णय घेतलाय.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा