InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

बाबू कवळेकर यांना उपमुख्यमंत्रीपद दिले जाणार ?

काँग्रेसचे 15 पैकी 10 आमदार फोडल्यानंतर भाजपने आता गोवा मंत्रिमंडळात फेरबदल करण्याचे ठरवले आहे. या फेरबदलांमध्ये काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या बाबू कवळेकर यांना उपमुख्यमंत्रीपद दिले जाण्याची दाट शक्यता आहे. सध्या गोव्यामध्ये गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई आणि बाबू आजगावकर हे गोव्याचे उपमुख्यमंत्री आहेत. या दोघांना या पदावरून हटवण्यात येईल असे सांगण्यात येत आहे. कवळेकरांप्रमाणेच काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या बाबुश मोन्सेरात आणि फिलीप नेरी रॉड्रीग्ज यांच्याही गळ्यात मंत्रिपदाची माळ पडण्याची शक्यता आहे.

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांसोबत नव्याने भाजपमध्ये आलेल्या आमदारांसोबत दिल्लीकडे प्रयाण केले. या आमदारांची सावंत हे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा तसेच भाजपचे कार्यकारी अध्यक्ष नड्डा यांची भेट घालून देणार आहेत. ही भेट झाल्यानंतर तिथूनच मंत्रिमंडळातील बदलांवर शिक्कामोर्तब होईल. शुक्रवारी मंत्रिमंडळ पुनर्रचनेची घोषणा करण्यात येण्याची शक्यता आहे. या पुनर्रचनेमध्ये गोवा फॉरवर्डच्या सर्व मंत्र्यांना वगळले जाईल असे सांगण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply