Bacchu Kadu | “आजही मला ठाकरेंबद्दल आस्था पण…”; बच्चू कडू यांनी शिंदेंसोबत जाण्याचे सांगितले कारण

Bacchu Kadu | मुंबई : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनामधून काही आमदार आणि खासदारांना आपल्या सोबत घेऊन भाजप पक्षासोबत युती केली. त्यानंतर  राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं. यामुळे शिवसेना पक्ष पूर्णपणे विस्कळीत झाला, त्याचबरोबर उद्धव ठाकरेंकडे आता केवळ बोटावर मोजण्याइतकेच आमदार राहिले आहेत. शिंदेंसोबत गेलेल्या नेत्यांनी उद्धव ठाकरे (Uddhav ThackeraY) भेटीसाठी वेळ देत नाहीत, हे कारण असल्यामुळे ते शिंदेंसोबत गेले असल्याचं सांगितले. अशातच बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनीही एकनाथ शिंदे यांच्यासोबत का गेले यामागचे कारण सांगितले आहे.

काय म्हणाले बच्चू कडू (Bacchu Kadu)

उद्धव ठाकरे मला भेटायचे. अपंगांचे प्रश्न घेऊन मी अनेकदा त्यांच्याकडे गेलो. ते सर्वसामान्यांची कामं करायला तयार असायचे. पण आजूबाजूचे लोक कामच करायचे नाहीत. अधिकारी वर्ग टाळाटाळ करायचा. त्यामुळे लोकांची कामं व्हायची नाहीत. लोक विचारायचे की तुम्ही आता सत्तेत आहात राज्यमंत्री आहात. मग कामं का होत नाहीत?. त्याचबरोबर दिव्यांग लोकांच्या संदर्भात अडीच वर्षात एकही मिटिंग झाली नाही, हे योग्य नाही. त्यामुळे शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला असल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलं आहे.

बच्चू कडू यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. मतदार संघातील प्रश्न प्रलंबित होते. लोकांचे प्रश्न सोडवायचे असतील तर सत्तेत असणं गरजेचं आहे. त्यामुळे मी लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी शिंदेसोबत जायचं ठरवलं.

पुढे बोलताना बच्चू कडू असंही म्हणाले की, उद्धव ठाकरेंबद्दल आजही मला आस्था आहे. पण ठाकरे मातोश्रीवर जेवढे शोभून दिसायचे. लोकांची कामं व्हायची. तसं त्यांचं काम वर्षा बंगल्यावर म्हणजेच मुख्यमंत्री झाल्यावर तसं दिसलं नाहीत.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.