Bacchu Kadu | “आम्हालाही मुख्यमंत्री व्हायचंय”; बच्चू कडूंनी जाहीर सभेत बोलून दाखवली इच्छा

Bacchu Kadu | मुंबई : राज्याच्या राजकारणात आठ महिन्यांपूर्वी मोठी घडामोड घडली. शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांना सोबत घेऊन बंडखोरी केली. त्यांच्या या बंडखोरीने राज्यात मोठा सत्ताबदल झाला. महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं आणि उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे.

शिवसेनेचे एकनाथ शिंदेंनी ४० आमदार आणि अपक्षांसह भाजपबरोबर सत्ता स्थापन केली. मात्र, अद्यापही मंत्रिमंडळचा दुसारा विस्तार न झाल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. ‘प्रहार’ संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांनीही मंत्रिमंडळ विस्तारावरून वेळोवेळी जाहीररित्या रोखठोक भूमिका मांडली आहे. त्यातच आता बच्चू कडूंनी मुख्यमंत्री पदाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

“आम्हालाही मुख्यमंत्री व्हायचंय” (Bacchu Kadu)

“प्रहार हा आपल्या अमरावतीवाल्यांचा पक्ष आहे, हा काही दिल्ली-मुंबईवाला पक्ष थोडी आहे. आपल्या मातीतला पक्ष आहे. लोकं म्हणतात आम्ही गद्दारी केली. आम्ही कशाची गद्दारी केली, आमचा स्वतंत्र पक्ष आहे. तुम्ही जर मुख्यमंत्री होत आहात, तर आम्हाला सुद्धा मुख्यमंत्री व्हायचं आहे. आमचं पण राजकारण आहे, आम्ही सुद्धा तसं करु शकतो,” असं बच्चू कडूंनी सांगितलं आहे.

शिंदे आणि फडणवीस सरकारमध्ये अद्यापही बच्चू कडू यांच्या पदरी काहीच नसल्याने ते नाराज असल्याचं म्हटलं जात आहे. तसेच विरोधी पक्षाकडून सत्ताधारी शिवसेना आणि इतर बंडखोर नेत्यांना गद्दार म्हटलं जात आहे. या सर्वांवर आता बच्चू कडू यांनी त्यांना मुख्यमंत्री व्हायचं असल्याची इच्छा बोलून दाखवली आहे.

महत्वाच्या बातम्या-

You might also like

Comments are closed.