Bacchu Kadu | “आम्ही गुवाहटीला गेलो तेव्हा समजलं भटक्या कुत्र्यांना…”; सभागृहात बोलताना कडूंनी दिला अजब सल्ला

Bacchu Kadu | मुंबई : विधानसभेत आज (३मार्च) भटक्या कुत्रांचा मुद्दा अधिवेशनात उपस्थित केला होता. यावर आमदार अतुल भातळकर, आमदार प्रताप सरनाईक, आमदार सुनील टिंगरे यांनी भटक्या कुत्र्यांवर कारवाई करण्याची अधिवेशनात मागणी केली. यावर आता आमदार बच्चू कडू यांनी ‘भटक्या कुत्र्यांना आसामला पाठवा’, असा अजबच सल्ला दिलाय.

भटक्या कुत्र्यांबाबत कडू म्हणाले की, “पाळीव कुत्री जर रस्त्यावर येत असतील तर आधी त्यांच्यावर कारवाई करा. हा सोपा इलाज भटक्या कुत्र्यांबाबत त्यांनी सांगितला आहे. त्यांच्यावर समिती नेमण्यापेक्षा कृती योजना जाहीर करायला हवी. एखाद्या शहरात तसाच प्रयोग करण्यात यावा.”

नेमकं काय म्हणाले बच्चू कडू?

“आसाममध्ये रस्त्यावर फिरणाऱ्या कुत्र्यांना अधिक किंमत आहे. रस्त्यांवरील भटक्या कुत्र्यांना उचलून आसाममध्ये नेऊन टाका. आम्ही गुवाहाटीला गेल्यावर काळालं आठ ते नऊ हजार रुपयांना भटके कुत्रे विकली जातात. आपल्याकडं बोकडाचं मांस खाल्लं जातं. तसेच तिकडे कुत्र्याचं मांस खाल्लं जातं.” असं आमदार बच्चू कडू यांनी सांगितलं आहे.

“तेथील व्यापाऱ्याला बोलवून यावर उपाययोजना करण्याची गरज आहे. एक दिवस यावर तोडगा निघेल. यासाठी सरकारशी बोलण्याची गरज आहे. याचा उद्योग होईल आणि ते घेऊन जातील. एकदाच विषय संपवून टाका”, असं बच्चू कडूंनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

You might also like

Comments are closed.