Bacchu Kadu | काही गोष्टींचा अतिरेक केला की त्याचे परिणाम भोगावे लागतात; किरीट सोमय्या व्हिडिओ प्रकरणावर बच्चू कडूंची प्रतिक्रिया

Bacchu Kadu | नवी दिल्ली: भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यांच्या या व्हिडिओनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

त्याचबरोबर या व्हिडिओ प्रकरणावरून विरोधी पक्षातील नेत्यांनी किरीट सोमय्या यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे. याच पार्श्वभूमीवर आमदार बच्चू कडू यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

Do not intrude into someone’s personal life – Bacchu Kadu

माध्यमांशी संवाद साधत असताना आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) म्हणाले, “मला असं वाटतं काही गोष्टींचा अतिरेक केला की त्याचे परिणाम भोगावे लागतात. त्या व्हिडिओमध्ये नक्की काय आहे? तो व्हिडिओ कशा संदर्भात आहे? हे मी अजून पाहिलेलं नाही.

मी अजून तो व्हिडिओ पाहिलेला नाही. मात्र, कुणाच्या व्यक्तिगत जीवनामध्ये घुसू नये. व्यक्तिगत कोण कसं आहे, याबाबत आपण जास्त चौकशी करू नये, असं मला वाटतं.”

यावेळी बोलत असताना बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी आपली मंत्रीपदाबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले, “सध्या 40-50 आमदार आहेत आणि सर्वांनाच मंत्रिपद हवं आहे.

त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) अडचणीत सापडले आहे. यावरून मुख्यमंत्र्यांची सध्या ओढाताण सुरू आहे. म्हणून मुख्यमंत्र्यांची अडचण कमी करण्यासाठी मी मंत्रीपदावरचा दावा सोडत आहे.”

पुढे बोलताना ते (Bacchu Kadu) म्हणाले, “आम्हाला मंत्रिमंडळात तुम्ही हवे आहात असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. मात्र, मी त्यांना माझ्या ऐवजी दुसरा मंत्र्याला संधी देण्याचं सांगितलं आहे. माझ्या जागी हवं तर आमदार राजकुमार पटेल यांना मंत्रीपद द्या, अशी मागणी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे केली आहे.”

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3Oic4fh