Bacchu Kadu | “त्या नुकत्याच शिवसेनेत आल्यात, आम्हाला कुणी गद्दार…”; अंधारेंच्या ‘त्या’ टीकेवरुन बच्चू कडूंचं प्रत्युत्तर

Bacchu Kadu | मुंबई : शिवसेनेतील बंडखोरीनंतर ठाकरे गटाने पक्षबांधणीला सुरुवात केली आहे. ‘शिवगर्जना’ यात्रेच्या माध्यमातून शिवसेना नेते विविध मतदारसंघात जात जनतेशी संवाद साधणयाचं काम ठाकरे गटाकडून सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी अलीकडेच अमरावतीत सभा घेतली. या सभेतून अंधारे यांनी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं. “देवेंद्र फडणवीस नवनीत राणांच्या हाताने बच्चू कडूंचा गेम करत आहेत,” असं वक्तव्य सुषमा अंधारे यांनी केले आहे.

Bachhu Kadu Criticize Sushma Andhare

“सुषमा अंधारे या आताच शिवसेनेत आल्या आहेत. त्या भाषणही चांगलं देतात. त्यांची भाषण देण्याची शैली, त्यांचा अभ्यास एवढा चांगला आहे की, आमच्यासारख्याला वाटतंय की चाललं जायला पाहिजे डब्बल शिवसेनेत (शिवसेनेत पुन्हा गेले पाहिजे). एवढ्या चांगल्या आहेत, आमच्या अंधारेताई”, अशा उपाहासात्मक शब्दांत आमदार बच्चू कडू यांनी शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांचा समाचार घेतला.

“आमच्या पक्षाचं नाव प्रहार आहे. बाकीच्या पक्षाचं नाव प्रहार आहे का? आम्ही वार करतो. आम्ही फसत नाही. देवेंद्रजी आम्हाला मदतच करणार आहेत. केवळ एक फोन केला म्हणून कुणी गुवाहाटीला जातं नाही. आम्ही नुकतंच 150 कोटींचा निधी मिळवला. यामध्ये रस्ते विकासासाठी कालच 127 कोटी रुपये मंजूर केले”, असं बच्चू कडू म्हणाले आहेत.

“अचलपूरच्या इतिहासात पहिल्यांदा एवढी मोठी रक्कम आली आहे. मतदारसंघाचा विकास महत्त्वाचा आहे. आमची 15 वर्षे अशीच गेली. आम्ही सत्तेच्या बाहेर पडून आंदोलनं केली. भांडणं केली. त्याकाळात मतदारसंघ थोडा मागे राहिला. आता आपण चार प्रकल्प मंजूर केले आहेत. शेवटी मतदारसंघाचा विकास महत्त्वाचा असतो”, असंही बच्चू कडूंनी सांगितलं आहे.

Bachhu Kadu Replied to Sushma Andhare

“शिवसेनेचा आणि आमचा संबंध कुठे आला इथे.. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेना यांच्याशी आमचा काहीही संबंध नाही. आमचा स्वत:चा पक्ष आहे. स्वत:ची मेहनत आहे. आमची स्वत:ची पानटपरी आहे. ही पानटपरी कुठे लावायची, हे आम्ही ठरवू… त्यामुळे आम्हाला कुणी गद्दार म्हणण्याचं शहाणपण शिकवू नये. आम्ही गद्दारी केली नाही. माझ्या प्रचारासाठी सभा घ्यायला उद्धव ठाकरे आले नव्हते. तरीही तुम्ही आम्हाला गद्दार कसं म्हणू शकता?”, असा सवाल बच्चू कडूंनी केला आहे.

सुषमा अंधारे यांचा अचलपूरचा अभ्यास थोडा कमी आहे. त्यांनी सांगितलं की शिवसेनेने मला मदत केली. माझ्या विरोधात शिवसेनेकडून अनंत गुडे उभे होते, त्यांना 19 हजार मते मिळाली आणि डिपॉझिट जप्त झाले, हे सुषमाताईंना माहिती नाही. सुरेखा ठाकरे माझ्याविरोधात शिवसेनेकडून लढल्या असल्याचं बच्चू कडूंनी सांगितलं आहे.

“शिवसैनिकांनी शिवसेनेच्या उमेदवाराला मत दिलं नाहीत”

सुरेखा ठाकरे यांना 3500 मतं मिळाली, त्यांचंही डिपॉझिट जप्त केले. त्यानंतर शिवसेनेकडून लढलेल्या सुनीता फिसके यांचंही डिपॉझिट जप्त केलं. असं असूनही सुषमा अंधारे म्हणतात, बच्चू कडूंना शिवसेनेने मदत केली. शिवसेनेचे उमेदवार उभा करून आम्हाला मदत करता का? ताई. म्हणजे तुम्ही शिवसेनेच्या उमेदवारांसोबत बेईमानी केली नाही का? ही बेईमानी केली नाही, पाहिजे ना. शिवसैनिकांनी शिवसेनेच्या उमेदवाराला मत दिलं नाहीत, तर बच्चू कडूला मत मारलं आहे, अशी खिल्लीही त्यांनी अंधारेंची उडविली आहे.

Bacchu Kadu aggressive on Sushma Andhare

“राहिला प्रश्न गुवाहाटीला जाण्याचा… तर गुवाहाटीला जायचं की नाही? हे कोण ठरवणार? गेली 20 वर्षे आमच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. त्यामुळे कुठे जायचं आणि कुठे नाही? हे आम्ही ठरवणार… आम्ही स्वत:च्या अंगावर केसेस घेतल्या. आम्ही लोकांचा मार खाल्ला. त्यामुळे आम्ही कुणाबरोबर बसायचं? हे आता तुम्ही सांगणार का?” असा सवाल बच्चू कडूंनी विचारला आहे.

महत्वाच्या बातम्या-

You might also like

Comments are closed.