Bacchu Kadu | बच्चू कडूंना मिळणार दिव्यांग मंत्रीपद? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Bacchu Kadu | मुंबई: सर्वोच्च न्यायालयाने सत्ता संघर्षाचा निकाल दिल्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध भाजप आणि शिंदे गटातील आमदारांना लागले आहे. अशात मोठी माहिती समोर आली आहे. येत्या 23 आणि 24 मे रोजी रखडलेल्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची चर्चा सुरू आहे. यामध्ये प्रतीक्षेत असणाऱ्या बच्चू कडू यांना दिव्यांग मंत्रीपद मिळणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भरत गोगावले यांना जलसंधारण मंत्री, संजय शिरसाठ यांना परिवहन आणि समाज कल्याण मंत्री तर बच्चू कडूंना दिव्यांग मंत्री पद मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर प्रताप सरनाईक, सदा सरवणकर, चिमणराव पाटील, यामिनी जाधव यांना देखील मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत आलेल्या 50 आमदारांपैकी प्रत्येकालाच मंत्रिपद मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात अनेकांचा अपेक्षाभंग झाला. याबाबत काहींनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. आता दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये 28 जागा रिक्त आहे. या विस्तारामध्ये कुणाकडे कुठले मंत्रीपद मिळणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

काय म्हणाले होते बच्चू कडू (What did the Bacchu Kadu?)

लवकर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले होते. या विस्तारात माझी वर्णी लागणार की नाही हे सांगता येत नाही. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला शब्द दिला होता. ते आपला शब्द पाळतील. अशात बच्चू कडू यांच्याकडे दिव्यांग मंत्रीपद जाण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/41SLrBp

You might also like

Comments are closed.