Bacchu Kadu | महापुरुषांबद्दल कोणी वाईट बोलत असेल तर त्याला रट्टा दिला पाहिजे – बच्चू कडू

Bacchu Kadu | अमरावती : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने उद्या मुंबईत महाविकास आघाडीचा भव्य मोर्चा आहे. यावर शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू यांनी अमरावती प्रतिक्रिया दिली. महापुरुषांबद्दल वक्तव्य करणाऱ्या विरोधात मोर्चा काढत असेल तर ते चांगलंच आहे.  तसेच महापुरुषाबद्दल कोणी वाईट बोलत असेल तर त्याला रट्टा दिला पाहिजे, अस ठाम मत  बच्चू कडू यांनी व्यक्त केलं.

राज्यपालांनी महापुरुषांबद्दल असं पुन्हा पुन्हा बोलू नये. तर कोणत्याही पक्षाच्या नेत्यांनी सांभाळून महापुरुषाबद्दल बोलले पाहिजे. उद्याचा महाविकास आघाडीचा मोर्चा ऐतिहासिक आहे, असं म्हणत बच्चू कडू यांनी महाविकास आघाडीच्या मोर्चाला समर्थन दिले आहे.

भाजप नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे महाविकास आघाडीने राज्य सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. सीमा समस्या, बेरोजगारी इत्यादी प्रश्नांवर शिंदे-फडणवीस सरकारला जाब विचारण्यासाठी महाविकास आघाडी उद्या १७ डिसेंबरला महामोर्चा काढणार आहे. हा मोर्चा मुंबईतील जिजामाता उद्यान ते आझाद मैदान असा असेल. मात्र या मोर्चाला सरकारकडून अद्याप परवानगी मिळाली नाही. त्यामुळे विरोधक आक्रमक झाले आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सरकारला सवाल केला आहे.

अजित पवार काय म्हणाले –

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा आणि महागाई, बेरोजगारी, महाराष्ट्रातील महापुरुषांचा सातत्याने होत असलेला अवमान या प्रश्नांवर महाविकास आघाडीने 17 डिसेंबर रोजी काढलेल्या मोर्चात महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेने सामील व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले. काल (गुरुवार) महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ज्यांचा पक्षाशी संबंध नाही, पण त्यांचा स्वाभिमानही दुखावला गेला आहे, असे सर्व लोक मोर्चात सहभागी होतील, असे ते म्हणाले.

या महाविकास आघाडीतर्फे काढण्यात येणाऱ्या हल्लाबोल मोर्चाला पोलिसांनी अद्याप परवानगी दिलेली नाही, असे अजित पवार म्हणाले. या मोर्चासाठी आम्ही परवानगी मागितली आहे. परवानगी हा मोठा मुद्दा नाही, परवानगी दिली जाईल आणि कोणत्याही परिस्थितीत हल्लाबोल मोर्चा निघणार असल्याचे पवार म्हणाले. मोर्चा शांततेत काढणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या : 

You might also like

Comments are closed.