Bacchu Kadu | मुख्यमंत्र्यांची अडचण दूर करण्यासाठी मी मंत्रिपदाचा दावा सोडला – बच्चू कडू

Bacchu Kadu | नवी दिल्ली: अजित पवार (Ajit Pawar) गट शिंदे-भाजप सरकारमध्ये सामील झाल्यानंतर आमदार बच्चू कडू यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर त्यांनी मंत्रिपदाचा दावा सोडणार असल्याचं म्हटलं होतं. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या विनंतीमुळे त्यांनी तात्पुरता तो निर्णय मागे घेतला होता. त्यानंतर आज बच्चू कडू यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.

I will give up the ministerial claim – Bacchu Kadu

आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) म्हणाले, “सध्या 40-50 आमदार आहेत आणि मंत्रिपद कमी आहे. यामध्ये सर्वांनाच मंत्रिपद हवं  आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची (Eknath Shinde) अडचण कमी व्हावी यासाठी मी मंत्रीपदाचा दावा सोडणार आहे.

आम्हाला तुम्ही मंत्रिमंडळात हवे आहात, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. मात्र, मी त्यांना माझ्या ऐवजी दुसऱ्या मंत्र्याला संधी देण्यास सांगितली आहे.”

खातेवाटप झालं तेव्हा देखील बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्याचबरोबर अजित पवार गट सत्तेत सामील झाल्यानंतर बच्चू कडूंनी आपलं मत स्पष्ट व्यक्त केलं होतं.

अजित पवार सत्तेत सामील झाल्यानंतर बच्चू कडू म्हणाले, “सध्या तीन इंजिन एकत्र आले आहेत. ते मजबूत होऊ शकतात किंवा त्यामध्ये बिघाड देखील होऊ शकतो. या तिन्ही इंजिनमध्ये बिघाड होऊ नये म्हणून तिन्ही पक्षाचे नेते बैठका घेत आहेत.”

“एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जात असताना त्यांनी मला दिव्यांग मंत्रिपद देण्याचं कबूल केलं होतं. त्यानंतर त्यांनी मला ते पद दिलं. यासाठी मी एकनाथ शिंदे यांचा आयुष्यभर ऋणी राहील.

मी गुहावाटीला गेल्यामुळं मला दिव्यांग मंत्रालय मिळालं. यासाठी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गुलाम म्हणून काम करेल. त्याचबरोबर यासाठी त्यांचे मानावे तेवढे आभार कमी आहे,” असही ते (Bacchu Kadu) यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3pThiF2