Bacchu Kadu | मुख्यमंत्र्यांना भेटण्याआधी बच्चू कडूंनी केलं मोठं विधान, म्हणाले…
Bacchu Kadu | मुंबई : एकनाथ शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) आणि भाजप पक्षाचे नेते रवी राणा (Ravi Rana) यांच्यातील वाद आता विकोपाला गेला आहे. रवी राणा हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे समर्थक आहेत. तर बच्चू कडू एकनाथ शिंदे यांच्या गटातील आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राणा आणि कडू यांना चर्चेसाठी मुंबईला बोलावले आहे. अशातच बच्चू कडू यांनी बैठकीच्या आधी एक मोठं विधान केलं आहे.
काय म्हणाले बच्चू कडू (Bacchu Kadu)
माझी आमदार रवी राणा सोबत बैठकीला बसण्याची माझी इच्छा नाही. पण मुख्यमंत्री काय म्हणतात ते पाहू, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. बच्चू कडू यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना कडू म्हणाले आहेत की, एक तारखेच्या अल्टीमेंटममध्ये सध्या फेरबदल नाही. रवी राणा उत्तर जर समाधानकारक मिळालं तरच कार्यकर्त्यांना विचारून निर्णय घेऊ.
तसेच, बच्चू कडू यांच्या भूमिकेला काही नेत्यांनी पाठिंबा दिला आहे. त्यावर बोलताना सुप्रिया सुळे, राजू शेट्टी, गुलाबराव पाटील यांच्यासह ज्या नेत्यांनी मला पाठिंबा दिला त्यांचे आभार मानतो, असंही कडू यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, आज दुपारी तीन वाजता रवी राणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटणार आहेत. तर संध्याकाळी आठ वाजता बच्चू कडू शिंदेंना भेटण्यासाठी मुंबईला रवाना होणार आहेत. त्यामुळे या बैठकींमध्ये नक्की काय होणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Kailas Patil | “बाबा…”, कैलास पाटलांच्या मुलीचा हट्टाने सर्वांनाच केलं भावूक
- Halloween 2022 | नक्की काय आहे हॅलोवीन सण, जाणून घ्या
- Kangana Ranaut | कंगना रनौत करणार सोशल मीडियावर कमबॅक?, म्हणाली…
- Ambadas Danave | कडू-राणा वादावर अंबादास दानवेंचं वक्तव्य, म्हणाले…
- New Project | अनेक प्रकल्प बाहेर जात असतानाच महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी, अॅमेझाॅन कंपनीने केली ठाण्यात गुंतवणूक
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.