Bacchu Kadu | सरकारमध्ये राहायचं की नाही? बच्चू कडूंचं ठरलं

Bacchu Kadu | अमरावती: अजित पवार (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडखोरी करत महायुती सरकारमध्ये सामील झाले आहे. त्यानंतर अजित पवार गटाच्या नऊ मंत्र्यांच्या शपथविधी झाला. यानंतर महायुती सरकारमधील काही आमदार नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. तर आमदार बच्चू कडू यांनी जाहीरपणे आपली नाराजी बोलून दाखवली होती.

गेल्या दोन दिवसापासून मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र अद्यापही खातेवाटप आणि मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त लागलेला नाही. त्यामुळे मंत्रीपदासाठी इच्छुक आमदारांची नाराजी वाढत चालली आहे. याच पार्श्वभूमीवर आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) आपली थेट भूमिका मांडणार आहे.

Today at 11 am Bacchu Kadu will present the role clearly

आज सकाळी 11 वाजता बच्चू कडू (Bacchu Kadu) आपली भूमिका स्पष्टपणे मांडणार आहे. सरकारमध्ये राहायचं की नाही याबाबत ते भाष्य करणार आहेत. त्यांच्या या निर्णयाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. कारण आमदार बच्चू कडू यांच्या निर्णयानंतर राज्य सरकारमध्ये काही फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, काल (13 जुलै) माध्यमांशी संवाद साधत असताना बच्चू कडूंनी (Bacchu Kadu) मोठं वक्तव्य केलं होतं. ते म्हणाले, “सरकारमध्ये खाते वाटपाचा गोंधळ सुरू आहे. सध्या तीन इंजिन एकत्र आलेले आहेत.

या तिन्ही इंजिनमध्ये बिघाड होऊ शकतो किंवा ते मजबूतही होऊ शकतात. यामध्ये बिगड होऊ नये म्हणून बैठकी सुरू आहेत. अपेक्षा ठेवून मी कधीच चालत नाही. त्यामुळे मला कुठल्याही मंत्रीपदाची अपेक्षा नाही.”

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3pLi9rm