Bacchu Kadu | सरकारला साथ देणार की नाही? बच्चू कडूंनी स्पष्टच सांगितलं

Bacchu Kadu | अमरावती: मंत्रिमंडळ विस्तारावरून भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटातील आमदार अस्वस्थ असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. या पार्श्वभूमीवर सरकारमध्ये राहायचं की नाही? याबाबत आमदार बच्चू कडू स्पष्टीकरण देणार होते. बच्चू कडूंचा निर्णय झालेला असून त्यांनी मंत्रिपदाच्या शर्यतीतून बाहेर पडणार असल्याचं म्हटलं आहे. त्यांच्या या निर्णयानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

बच्चू कडू (Bacchu Kadu) म्हणाले, “मागच्या राज्य मंत्रिमंडळ विस्तारामध्ये उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) आम्हाला मंत्रिपद दिलं होतं. तुम्ही आम्हाला पाठिंबा दिला तर बरं होईल असं उद्धव ठाकरेंनी स्वतः फोन करून मला सांगितलं होतं. त्यानुसार आम्ही त्यांना पाठिंबा दिला. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी दिलेला शब्द पाळत आम्हाला मंत्रिपद दिलं.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत जात असताना त्यांनी मला दिव्यांग मंत्रीपद देण्याचं कबूल केलं होतं. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मला ते पद दिलं. यासाठी मी एकनाथ शिंदे यांचा आयुष्यभर मी ऋणी राहील.”

We are tired of changing politics – Bacchu Kadu 

पुढे बोलताना ते (Bacchu Kadu) म्हणाले, “मात्र सध्याच्या बदलत्या राजकारणाचा आम्हाला कंटाळा आलेला आहे. सगळंच काही पदासाठी नसतं. त्यामुळे आमची भूमिका ठाम आहे. येत्या काळामध्ये आम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करायचं आहे. मंत्रीपदाचा दावा सोडणार असल्याचा निर्णय मी आज घेणार होतो.

मात्र, हा निर्णय मागे घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मला वारंवार फोन करत आहेत. हा निर्णय आज नको तर मला (एकनाथ शिंदे) भेटून घे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मला म्हणाले.

“मी मंत्रीपदाचा दावा सोडण्याचा निर्णय आज घेणार होतो. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विनंतीमुळे हा निर्णय मी त्यांना भेटून घेणार आहे. 17 जुलैला शिंदे यांची भेट झाल्यानंतर 18 जुलैला मी याबाबत निर्णय घेणार आहे”, असही ते (Bacchu Kadu) यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3ObcmVf