Bachchu Kadu | “उद्धव ठाकरेंमुळे काँग्रेसला संजीवनी मिळेल” – बच्चू कडू

Bachchu Kadu | अमरावती : सध्या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि काँग्रेस नेते राहुल गांधी ( Rahul Gandhi) यांच्या भेटीच्या चर्चा रंगत आहेत. सत्तांतरानंतर ठाकरे गट कमकुवत झालेला पाहायला मिळत आहे. तर महाविकास आघाडी सध्या वज्र्यमूठ सभा घेत असून पहिली सभा छत्रपती संभाजीनगर येथे झाली होती तर दुसरी सभा 16 एप्रिल ला नागपुरात होणार आहे. यावरून राजकीय वर्तुळात भाजपकडून टीका टिप्पणी सुरू आहे. तर प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू ( Bachchu Kadu) यांनी राहुल गांधी आणि ठाकरे भेटीबद्दल टीका केली आहे.

उद्धव ठाकरेंमुळे काँग्रेसला संजीवनी मिळेल -(Uddhav Thackeray will give Congress a boost )

तर माध्यमांशी बोलताना बच्चू कडू म्हणाले की, जर महाविकास आघाडी एकजूट आली तर त्याचा फायदा काँग्रेस ला होईल. तसचं उद्धव ठाकरेंमुळे काँग्रेसला संजीवनी मिळेल असं देखील त्यांनी म्हंटल. राहुल गांधी यांना ठाकरे रुपी संजीवनी मिळेल असा टोला देखील त्यांनी लगावला आहे. याचप्रमाणे नागपूरच्या महाविकास आघाडीच्या सभेदरम्यान कोणते नेते उपस्थित रहातात यावरून त्यांची एकी कळेल असं देखील त्यांनी म्हटलं.

दरम्यान, बच्चू कडू यांनी सांगितलं की राहुल गांधी यांनी पदयात्रा काढली त्याचा आगामी काळात काहीतरी फरक पडेल अस सर्वांना वाटतं होत परंतु त्याचा काहीच फरक पडलेला दिसत नाही. उलट काँग्रेसचे कार्यकर्ते फुटायला लागले आहेत. यात्रेचा फरक जनतेवर पडला नाही तर भेटीचा कसा पडेल अस देखील बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

You might also like

Comments are closed.