Bachhu Kadu। 1 नोव्हेंबरला ट्रेलर, तर 15 दिवसांनी पिक्चर दाखवेन; बच्चू कडूंचा थेट शिंदे-फडणवीसांना इशारा

Bachhu Kadu। मुंबई : सध्या राजकीय वर्तुळात आमदार रवी राणा (Ravi Rana) आणि आमदार बच्चू कडू (Bachhu Kadu) याच्या वाद सुरु आहे. रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर, शिंदे गटासोबत गुवाहाटीला जाण्यासाठी ५० खोके घेतल्याचा आरोप केला होता. त्यानंतर बच्चू कडू यांनी पत्रकार परिषद घेत रवी राणा यांनी माझ्यावर केलेल्या आरोपाचे पुरावे द्यावेत, असे आव्हान दिले होते. यानंतर आता 1 नोव्हेंबरपर्यंत या प्रश्नाचं उत्तर नाही मिळालं तर मोठा बॉम्बच फोडणार असल्याचा इशारा बच्चू कडू यांनी रवी राणा यांना दिला आहे.

या इशाऱ्यानंतर आता आणखीन एक मोठा दावा कडू यांनी केला आहे. कडू यांनी आता राणांना थेट आव्हानच दिले आहे. आता रवी राणा यांच्यासोबत आरपारची लढाई असल्याचे कडूंनी सांगितले आहे. 1 नोव्हेंबरला तर ट्रेलर तर १५ दिवसांनी पिक्चर दाखवू, असा इशाराच कडूंनी दिला आहे. शिंदे फडणवीसांनी याबाबत समोर यायला पाहिजे, स्पष्टीकरण दिले पाहिजे.

तसेच यानंतर पुढे बोलताना कडू म्हणाले कि, हा माझ्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. अस्तित्वच धोक्यात येत असेल तर बाकी गोष्टी महत्त्वाच्या नाहीत. आपण फुसका बार आहे की बॉम्ब आहे, 1 तारखेला दाखवू. फटाके 1 तारखेला वाजणारच, असे आवाहन त्यांनी थेट शिंदे फडणवीसांना दिलं आहे. यानंतर आता या प्रकरणात पुढे काय होणार याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाच लक्ष लागलं आहे.

महत्वाच्या बातम्याः

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.