Bachhu Kadu | “…अन्यथा मुंबईत येऊन अधिकाऱ्यांचे तोंड रंगवू”, आमदार बच्चू कडू असं का म्हणाले?

Bachhu Kadu | अमरावती : अमरावती जिल्ह्यातील पाच तालुक्यांना पिक विम्यातून वगळल्याने तसेच जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना पिक विमाचे कमी पैसे मिळाल्याने आज अमरावतीच्या शासकीय विश्रामगृहात आमदार बच्चू कडू (Bachhu Kadu) यांनी पिक विमा कंपनीचे अधिकारी व जिल्हा कृषी अधिकारी अनिल खर्चांण यांच्या सोबत बैठक घेतली. त्यांनी विमा कंपनीच्या मुंबई येथील कार्यालयातील अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून चर्चा केली.

बच्चू कडू यांनी २५ टक्के अग्रिम न दिल्याबद्दल अधिकाऱ्यांना धारेवर धरले. कृषी सचिवांशी देखील बच्चू कडू यांनी चर्चा केली. जिल्ह्यातील सुमारे १ लाख १७ हजार शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रिम मिळणे आवश्यक होते. पण, ते विमा कंपनीने दिलेले नाही. जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिसूचनेचे पालन झालेले नाही. ८१ मंडळांमध्ये नुकसान भरपाई प्रस्तावित असताना विमा कंपनीने केवळ ९ मंडळे गृहीत धरल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

यासंदर्भात आता जिल्हा कृषी अधीक्षकांमार्फत प्रस्ताव पाठवून तोडगा काढला जाणार आहे. सुमारे १८ हजार शेतकऱ्यांना काही कारणांमुळे पूर्वसूचना देता आली नाही. त्यांचाही विचार केला जावा, अशी आमची मागणी आहे. येत्या आठ दिवसांत शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्यास अधिकाऱ्यांचे तोंड रंगवू, असा इशारा बच्चू कडू यांनी दिलाय.

यंदाच्या पावसाळ्यात सोयाबीन पीक पूर्णपणे उध्वस्त झालं, अमरावती जिल्ह्यात 81 मंडळामध्ये मोठ्या प्रमाणात झाला आहे, शासन निर्णयानुसार 125 टक्के पाऊस होऊन देखील शेतकऱ्यांना त्वरित 25 टक्के पीक विमा मिळाला नाही पण तीन महिने झाले. अद्यापही शेतकऱ्यांना पिक विमा मिळाला नाही, तर पिक विमा कंपनी व कृषी विभागात खूप मोठा घोळ आहे, असा आरोप बच्चू कडू यांनी केला.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed.