Bachhu Kadu | “माझा इशारा फुसका बार की बॅाम्ब हे १ तारखेला समजेल”; बच्चू कडूंचा रवी राणांना इशारा
Bachhu Kadu । नागपूरः गेल्या काही दिवसांपासून रवी राणा (Ravi Rana) आणि बच्चू कडू (Bachhu Kadu) यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध पाहायला मिळत आहे. रवी राणा यांनी बच्चू कडू (Bachhu Kadu) यांच्यावर, शिंदे गटासोबत गुवाहाटीला जाण्यासाठी ५० खोके घेतल्याचा आरोप केला होता. त्यानंतर बच्चू कडू यांनी पत्रकार परिषद घेत रवी राणा यांनी माझ्यावर केलेल्या आरोपाचे पुरावे द्यावेत, असे आव्हान दिले होते. यानंतर आता 1 नोव्हेंबरपर्यंत या प्रश्नाचं उत्तर नाही मिळालं तर मोठा गौप्यस्फोट करेन, असा इशाराही बच्चू कडू यांनी दिलाय.
त्यानंतर माझे फुसके फटाके आहेत की बॉम्ब आहे हे कळेल, असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलंय. रवी राणांच्या आरोपांनंतर बच्चू कडू आक्रमक झाले असून त्यांनी रवी राणा यांच्यावर चांगलाच निशाणा साधलेला आहे. ते म्हणाले, हा वाद माझ्यापुरता मर्यादीत नाही. पैसे देऊन सरकार स्थापन झाले का? मग मला पैसे कुणी दिले? सर्व आमदारांनी अडचणीत आणणारे हे आरोप आहेत. रवी राणा यांनी केलेले आरोप मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर प्रश्नचिन्ह करत आहेत, त्यामुळे हे आरोप कायमचे मिटले पाहिजेत, असं त्यांनी म्हटलंय.
पुढे ते म्हणाले, “माझा इशारा फुसका बार आहे की बॅाम्ब आहे, हे 1 तारखेला दाखवू. कसा कुणाच्या खाली लावायचा बॅाम्ब हे बच्चू कडू ला चांगलं माहित आहे. मी नंगा होईल मला त्याचं काही फरक पडत नाही, माझं राजकारण चुलीत गेलं तरी चालेल’, असा इशारा देत त्यांनी रवी राणा यांच्यावर निशाणा साधलाय.
आम्ही रस्त्यावर आलो राजकारण सोडावं लागलं तरिही बेहत्तर, उद्या राजीनामा द्यावा लागला तरी चालेल, आम्ही त्याला आरपार करतो. ही आरपारची लढाई आहे. आम्ही जमिनीत नांगर घालणाऱ्यांची औलाद आहे. आम्ही नांगर घालून टाकू. ज्यांनी पडिक जमिन केली तिथे नांगर घालू, असंही ते म्हणालेत. आता बच्चू कडू नेमका काय गौप्यस्फोट करतायेत याकडे सर्वांचं लक्ष लागेलेलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Eknath Khadse | “मला त्रास दिला तर…”; एकनाथ खडसेंचा शिंदे-फडणवीस सरकारला इशारा
- PAK vs ZIM : पाकिस्तानने शेवटच्या चेंडूवर केली ‘चिटिंग’, तरीही झाला लाजिरवाणा पराभव, हा घ्या पुरावा
- Realme Launch | पुढच्या महिन्यात Realme ची ‘हि’ सीरिज होणार लाँच
- Rituja Latke । ऋतुजा लटके यांच्या अडचणी वाढणार?, निवडणूक आयोगाकडे तक्रार
- Chandrakant Khaire | आदित्य ठाकरेंना ‘छोटा पप्पू’ म्हणणाऱ्या अब्दुल सत्तारांवर चंद्रकांत खैरेंचा हल्लाबोल, म्हणाले…
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.