Bachhu Kadu | “राज्यपाल कोपऱ्यावरच राहतात त्यांची हकालपट्टी करण्याची गरज काय?”; बच्चू कडूंचा खोचक टोला

Bachhu Kadu | अमरावती : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी मराठवाडा विद्यापीठाच्या एका कार्यक्रमात बोलताना थेट छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यामुळे विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटल्या. यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पदावरून हटवण्याची मागणी करण्यात आली. या सर्व प्रकरणावर शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू (Bachhu Kadu) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“राज्यपाल कोश्यारी तसे कोपऱ्यावरच समुद्राच्या काठावर राहतात. ते काही मधात राहत नाही त्यामुळे त्यांची हकालपट्टी करण्याची गरज काय?”, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू (Bachhu Kadu) यांनी अमरावतीत दिली. पुढे ते म्हणाले,  नेते मंडळींनी थोर महापुरुषांबद्दल बोलताना सन्मानजनक बोललं पाहिजे. खबरदारी घेतली पाहिजे.”

दरम्यान, अमरावती जिल्ह्यातील पाच तालुक्यांना पिक विम्यातून वगळल्याने तसेच जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना पिक विमाचे कमी पैसे मिळाल्याने आज अमरावतीच्या शासकीय विश्रामगृहात आमदार बच्चू कडू यांनी पिक विमा कंपनीचे अधिकारी व जिल्हा कृषी अधिकारी अनिल खर्चांण यांच्या सोबत बैठक घेतली.

यंदाच्या पावसाळ्यात सोयाबीन पीक पूर्णपणे उध्वस्त झालं, अमरावती जिल्ह्यात 81 मंडळामध्ये मोठ्या प्रमाणात झाला आहे, शासन निर्णयानुसार 125 टक्के पाऊस होऊन देखील शेतकऱ्यांना त्वरित 25 टक्के पीक विमा मिळाला नाही पण तीन महिने झाले. अद्यापही शेतकऱ्यांना पिक विमा मिळाला नाही, तर पिक विमा कंपनी व कृषी विभागात खूप मोठा घोळ आहे, असा आरोप बच्चू कडू यांनी केला.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed.