Bachhu Kadu । “आधी मला लोक विरूवाले आमदार म्हणायचे, मग भिडू, आता खोकेवाले…”; बच्चू कडूंनी व्यक्त केली खंत

Bachhu Kadu । मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडांनंतर राज्यात शिंदे विरुद्ध ठाकरे गट असा वाद पेटला आहे. शिंदे गटाने भाजपसोबत युती करत राज्यात सरकार स्थापन केलं. मात्र आता शिंदे गटातील काही आमदार नाराज असल्याचा दावा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केला जात आहे. यावर शिंदे गटातील आमदार बच्चू कडू (Bachhu Kadu) यांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे. खोकेवाले आमदार म्हटलं जात असल्यानं वेदना होत असल्याचं त्यांनी यावेळी म्हंटल आहे.

बच्चू कडू म्हणाले, “टाकीवर चढल्याने आधी मला लोक विरूवाले आमदार म्हणायचे. मग भिडू म्हणत होते. काही ठिकाणी अपंगांचा कैवारी म्हणत होते. आता त्यात खोका आल्यानं वेदना होतायत” अशी खंत बच्चू कडू (Bachhu Kadu) यांनी व्यक्त केली. “राजकारणात कोणासोबत गेल्यानं पैसेच घेतले, असा त्याचा अर्थ होत नाही. राणा आधी राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर निवडून आले. दुसऱ्या दिवशी त्यांनी भाजपाला पाठिंबा दिला. मग त्यांनी खोके घेतले असं आम्ही म्हणायचं का?” असा सवाल त्यांनी केला आहे.

पुढे ते म्हणाले, “राजकारणात तडजोडी कराव्या लागलात. मात्र, गुवाहाटीला गेल्यानंतर लोकांचा आमच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. या तडजोडीचे दुष्परिणाम भोगावे लागले”, असेही कडू यावेळी म्हणाले. “राजकारणात या तडजोडी असतातच. या तडजोडी फार पूर्वीपासून करण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनीही या तडजोडी केल्या होत्या. मुघलांना शह देण्यासाठी निजामांना हाती पकडावचं लागलं”, असं म्हणत बच्चू कडूंनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

एकनाथ शिंदे यांच्यामुळेच मी पाठिंबा दिला होता

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यामुळंचं मी महाविकास आघाडीला सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता असेही बच्चू कडू यावेळी म्हणाले. त्यांच्याशी मैत्रीचं नातं होते. त्यामुळं सुरुवातीला त्यांना नाही म्हणता आलं नाही असेही कडू यावेळी म्हणाले. दरम्यान, मतदारसंघातील काम होण्यासाठी सत्ता महत्त्वाची असते. पण सत्तेत असूनही काही प्रश्न सुटले नसल्याचे कडू यावेळी म्हणाले. मी 15 वर्ष विरोधात काम केलं. तरी मतदारसंघातील लोक मलाच मत देत असल्याचेही कडू यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.