Bachhu Kadu । “ते बोलण्याची त्यांची कुवत नाही आणि ताकदही”; बच्चू कडूंचा रवी राणांवर पलटवार

Bachhu Kadu | अमरावती : अमरावती येथील आमदार रवी राणा आणि प्रहारचे आमदार बच्चू कडू यांच्यात चांगलाच वाद पेटताना दिसत आहे. बच्चू कडू यांनी केलेल्या किराणा वाटपावर रवी राणा यांनी टीका केली होती. यावरुन बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी बदनामीचा आरोप करत रवी राणा (Ravi Rana) यांच्या विरोधात राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. अलीकडेच राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांनी गुवाहाटीला जाऊन कोट्यवधी रुपये घेतल्याचा आरोप केला होता. या आरोपानंतर बच्चू कडू आक्रमक झाले आहेत. आज अमरावतीत पत्रकार परिषद घेत बच्चू कडूंनी आमदार रवी राणा यांच्यावर निशाणा साधलाय.

२०-२५ वर्षे आमचे राजकीय करिअर उभं करायला गेले असून रवी राणा यांनी माझी बदनामी केली असल्याचं बच्चू कडू म्हणाले. तसेच, मी जर पैसे घेऊन गुवाहाटीला गेलो असेल तर नक्कीच पैसे देवेंद्र फडणवीस अथवा एकनाथ शिंदेजी यांनी दिले असतील. तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना देखील नोटीस पाठवणार आहोत का. तुम्ही पैसे दिले असेल तर स्पष्ट करा, असा घणाघात बच्चू कडूंनी केला आहे.

नेमकं काय म्हणाले बच्चू कडू?

“आपल्याला आयुष्यात कष्टाशिवाय काहीही मिळत नाही. गेल्या २० वर्षांपासून मी मेहनत करत कोणत्याही पक्षाशिवाय, झेंड्याशिवाय, पैसे खर्च न करता चार वेळा आमदार झालो. त्यामुळे राणांकडून जे खालच्या स्तरावर आरोप करणं हे मनाला दुखवणारे असल्याचं बच्चू कडू म्हणालेत.

“राणांनी जे आरोप केले आहेत, ते बोलण्याची त्यांची कुवत नाही आणि ताकदही नाही. ते कोणाच्या जीवावर बोलत आहे, हे तपासणे गरजेचे आहे.” अशा शब्दात बच्चू कडू यांनी राणांवर टीका केलीय. केलेले आरोप एकट्या बच्चू कडूवर नाही, तर त्यामुळे ५० आमदारांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. तसेच या आरोपांमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याचं बच्चू कडू म्हणालेत. एकंदरीतच या लोकांना पैसे देऊन आमदारांना गुवाहटीला नेले, असा त्याचा अर्थ होऊ शकतो”, असंदेखील बच्चू कडू यावेळी बोलताना म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.