Bachhu Kadu । “मला गुवाहाटीवरून परत यायचं होतं, पण…”; बच्चु कडूंचा मोठा खुलासा
Bachhu Kadu । मुंबई : रवी राणा (Ravi Rana) यांनी बच्चू कडू (Bachhu Kadu) यांच्यावर, शिंदे गटासोबत गुवाहाटीला जाण्यासाठी ५० खोके घेतल्याचा आरोप केला होता. त्यानंतर बच्चू कडू यांनी पत्रकार परिषद घेत रवी राणा यांनी माझ्यावर केलेल्या आरोपाचे पुरावे द्यावेत, असे आव्हान दिले होते. यानंतर आता 1 नोव्हेंबरपर्यंत या प्रश्नाचं उत्तर नाही मिळालं तर मोठा बॉम्बच फोडणार असल्याचा इशारा बच्चू कडू यांनी रवी राणा यांना दिला आहे. बॉम्ब कुठे आणि कसा फोडायचा हे आपल्याला बरोबर माहीत असल्याचं ते म्हणालेत.
यानंतर आता पुन्हा एकदा एका मराठी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना बच्चू कडू म्हणाले कि, मला गुवाहाटीवरून परत यायचं होतं, अशी कबुली त्यांनी दिली. आमचे आमदार राजकुमार पटेल आधी गुवाहाटीला गेले होते. त्यानंतर मीही गेलो. पण माझं असं म्हणणं होतं की, मी जाऊन एकनाथ शिंदेंसोबत काही मुद्द्यांवर बोलून परत येईल, असं वाटलं होतं.
पण हे राजकारण आहे. त्यामुळे मलसा तिथून पर येता आलं नाही. कारण आम्हीही जेव्हा सत्ता स्थापनेच्या वेळी नगरसेवकांना घेऊन बाहेर जातो. तेव्हा त्यांनही आम्ही परत फिरू देत नाही. त्यामुळे तसंच माझ्यासोबतही झालं. हे राजकारण आहे. त्यामुळे अशा गोष्टी होत असतात,असं बच्चु कडू म्हणालेत. तसेच दिव्यांग लोकांच्या संदर्भात अडीच वर्षात एकही मिटिंग झाली नाही, हे योग्य नाही. त्यामुळे शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला, असंही ते म्हणालेत.
महत्वाच्या बातम्याः
- Bacchu Kadu | “आजही मला ठाकरेंबद्दल आस्था पण…”; बच्चू कडू यांनी शिंदेंसोबत जाण्याचे सांगितले कारण
- Government Job Recruitment | भारतीय गुप्तचर विभाग IB यांच्यामार्फत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू
- Explained | शिंदे -फडणवीस सरकारमुळे महाराष्ट्र कंगाल, गुजरात मालामाल! हे मोठे प्रकल्प केले दान
- Kishori Pednekar | “हा गाळा माझा असेल तर…”, किशोरी पेडणेकर संतापल्या
- Freddy | कार्तिक आर्यन च्या ‘फ्रेडी’ चित्रपटाचे फर्स्ट लूक रिलीज
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.