Back Pain | मासिक पाळी दरम्यान पाठदुखीच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी करा ‘या’ टीप्स फॉलो

Back Pain | टीम महाराष्ट्र देशा: महिलांना मासिक पाळी (Periods) सुरू असताना असाह्य वेदना सहन कराव्या लागतात. त्याचबरोबर या कालावधीमध्ये स्त्रियांना हाडे दुखणे, स्नायूंचा ताण, पाठ दुखी, कंबर दुखी इत्यादी समस्या उद्भवतात. या समस्यांवर मात करण्यासाठी बहुतांश महिला औषधांचे सेवन करतात. मात्र नियमित औषधांचे सेवन करणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या पाठदुखीपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही काही आयुर्वेदिक उपाय करू शकतात. हे उपाय केल्याने आरोग्याला कुठल्याही प्रकारचा धोका निर्माण होत नाही. त्यामुळे मासिक पाळी दरम्यान पाठदुखीची समस्या निर्माण झाल्यास तुम्ही पुढील आयुर्वेदिक पद्धतींचा वापर करू शकतात.

कापूर तेल (Camphor oil-For Back Pain)

पाठ दुखीपासून आराम मिळवण्यासाठी कापूर तेल फायदेशीर ठरू शकते. यासाठी तुम्ही घरातच कापूर तेल बनवू शकतात. हे तेल बनवण्यासाठी तुम्हाला एक वाटी खोबरेल तेलामध्ये कापुराचे काही तुकडे मिसळून घ्यावे लागेल. कापुराचा अर्क खोबरेल तेलात मिसळल्यावर तुम्ही त्या तेलाने कमरेला मसाज करू शकतात. या तेलाने कमरेला मसाज केल्यानंतर वेदना कमी होऊ शकतात.

एरंडेल तेल (Castor oil-For Back Pain)

एरंडेल तेल आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. कारण आरोग्याच्या अनेक समस्या टाळण्यासाठी या तेलाचा वापर केला जातो. मासिक पाळी दरम्यान पाठ दुखीच्या त्रासापासून मुक्त होण्यासाठी एरंडेल तेल उपयुक्त ठरू शकते. पाठ दुखीची समस्या निर्माण झाल्यास तुम्ही एरंडेल तेलाने पाठीवर मसाज करू शकतात. एरंडेल तेलाच्या मदतीने पाठ दुखीची वेदना कमी होऊ शकते.

निलगिरी तेल (Eucalyptus oil-For Back Pain)

निलगिरी ही एक औषधी वनस्पती आहे, जी वेदना कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. मासिक पाळीतील पाठदुखीच्या वेदना कमी करण्यासाठी तुम्ही निलगिरी तेलाचा वापर करू शकतात. यासाठी तुम्हाला बदामाच्या तेलामध्ये निलगिरीची पाने टाकून उकळून घ्यावे लागेल. हे तेल कोमट झाल्यानंतर तुम्ही पाठीवर त्याने मसाज करू शकतात. या तेलाने मसाज केल्यावर तुमची पाठ दुखीची वेदना कमी होऊ शकते.

मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या पाठ दुखीपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही वरील उपाय करू शकतात. त्याचबरोबर मासिक पाळीतील वेदना दूर करण्यासाठी तुम्ही खालील आयुर्वेदिक टिप्स फॉलो करू शकतात.

ओवा (Owa-For Periods Pain)

प्रत्येक भारतीय स्वयंपाक घरामध्ये ओवा सहज उपलब्ध असतो. मासिक पाळीतील समस्यांवर मात करण्यासाठी ओवा एक रामबाण उपाय ठरू शकतो. यासाठी तुम्हाला ओवा एक ग्लास पाण्यामध्ये उकळून घ्यावा लागेल. त्यानंतर तुम्हाला या पाण्याचे दिवसातून दोन ते तीन वेळा मध मिसळून सेवन करावे लागेल. या पाण्याचे सेवन केल्याने पोटदुखीच्या समस्येपासून आराम मिळू शकतो.

हळद आणि जायफळ (Turmeric and Nutmeg-For Periods Pain)

हळदीमध्ये अँटिइफ्लेमेटरी गुणधर्म आढळून येतात, जे पोटदुखीच्या समस्यांवर मात करण्यास मदत करतात. पोट दुखीच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही हळद आणि जायफळाचे एकत्र सेवन करू शकतात. यासाठी तुम्हाला दुधामध्ये चिमूटभर हळद आणि जायफळ मिसळून झोपण्यापूर्वी त्याचे सेवन करावे लागेल. या पेयाचे सेवन केल्याने मासिक पाळीतील वेदनांपासून आराम मिळू शकतो आणि चांगली झोप लागू शकते.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed.