Bad Breath | श्वासातील दुर्गंधी दूर करण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

Bad Breath | टीम महाराष्ट्र देशा: श्वासातून येणारी दुर्गंधी कधी-कधी खूप लाजिरवाणी ठरू शकते. या समस्येवर मात करण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे उपाय शोधत असतात. यामध्ये बहुतांश लोक वेगवेगळ्या प्रकारच्या माऊथ फ्रेशनरचा वापर करतात. मात्र, हे माऊथ फ्रेशनर तोंडाला दीर्घकाळ दुर्गंधीपासून दूर ठेवू शकत नाही. त्यामुळे या समस्यावर मात करण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करू शकतात. हे घरगुती उपाय केल्याने शरीराला कोणत्याही प्रकारची हानी होत नाही. श्वासातील दुर्गंधी दूर करण्यासाठी तुम्ही खालील घरगुती उपायांचा अवलंब करू शकतात.

बडीशेप (Fennel-For Bad Breath)

बडीशेप आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. बडीशेपचे सेवन केल्याने शरीरातील अनेक समस्या दूर होतात. त्याचबरोबर श्वासातून येणारा दुर्गंधही दूर होतो. जेवणानंतर बडीशेपचे सेवन केल्याने पचनक्रिया मजबूत होते आणि शरीर निरोगी राहते. त्याचबरोबर बडीशेपचा सुगंध तोंडाला फ्रेश ठेवून दुर्गंधी दूर करतो.

लवंग (Cloves-For Bad Breath)

लवंगामध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळून येतात. त्यामुळे लवंगाचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. श्वासातील दुर्गंधी दूर करण्यासाठी तुम्हाला लवंग हलक्या स्वरूपात भाजून घेऊन हवाबंद डब्यात साठवून ठेवावे लागेल. तोंडातील दुर्गंधी दूर करण्यासाठी तुम्ही या लवंगांना चघळू शकतात. नियमित असे केल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते आणि घशातील संसर्ग देखील दूर होऊ शकतो. त्याचबरोबर या लवंगाच्या मदतीने श्वासातील दुर्गंधी दूर होते.

इलायची (Cardamom-For Bad Breath)

इलायचीच्या मदतीने श्वासातील दुर्गंधी सहज दूर केली जाऊ शकते. यासाठी तुम्हाला काही खाल्ल्यानंतर इलायची चाघळावी लागेल. इलायची खाल्ल्याने दातांमध्ये संसर्ग कमी होतो आणि तोंडातील दुर्गंध देखील दूर होण्यास मदत होते.

श्वासातील दुर्गंधी दूर करण्यासाठी तुम्ही वरील घरगुती उपाय करू शकतात. त्याचबरोबर सूर्यफुलाचे तेल वापरल्याने आरोग्याला खालील फायदे होऊ शकतात.

हृदय निरोगी राहते (The heart remains healthy-Sunflower Oil Benefits)

सूर्यफुलाच्या तेलाचे नियमित सेवन केल्याने हृदय दीर्घकाळ निरोगी राहू शकते. त्याचबरोबर हे तेल कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. सूर्यफूल तेलामध्ये ॲलिक ॲसिड आढळून येते, जे हृदयाची काळजी घेण्यास मदत करते. त्यामुळे हृदयाची काळजी घेण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात सूर्यफूल तेलाचा समावेश करू शकतात.

पचनक्रिया मजबूत होते (Digestion is strengthened-Sunflower Oil Benefits)

सूर्यफूल तेलाचे सेवन केल्याने पचनक्रिया मजबूत होऊ शकते. हे तेल पचण्यासाठी खूप सोपे असते. इतर तेलांपेक्षा सूर्यफूल तेल खूप हलके असते, त्यामुळे ते पचायला सोपे जाते. सूर्यफूल तेलाचे नियमित सेवन केल्याने पोटाचे आरोग्य निरोगी राहू शकते.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

You might also like

Comments are closed.